शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

हा ‘व्हायरस’ बसेल कानात अन् कर्णबधीर लागतील ऐकू! संशोधकांची कमाल; चीनमध्ये प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 09:40 IST

या कर्णबधिर मुलांच्या कानात कोणतेही नुकसान न करणारा विषाणू बसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बीजिंग : देशातील ज्या मुलांना जन्मापासून ऐकू येत नव्हते त्यांना आता जीन थेरपीच्या यशस्वी चाचणीनंतर ऐकू येत आहे, असा दावा चीनमधील फुदन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या कर्णबधिर मुलांच्या कानात कोणतेही नुकसान न करणारा विषाणू बसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.प्रायोगिक उपचारांमुळे पाचपैकी चार मुलांना ऐकू येऊ लागले. ज्या मुलांना त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या श्रवण अक्षमतेमुळे ऐकू येत नाही त्यांच्यासाठी हा प्रयोग अतिशय उपयुक्त ठरणार आहे. ओटोफर्लिन जनुकामुळे ऐकण्याची क्षमता निर्माण होते.

उपचारानंतर मारली आईवडिलांना हाकअद्याप कोणतेही औषध श्रवण सुधारण्यास सक्षम नाही, त्यामुळे चीनचे हे यश उल्लेखनीय मानले जात आहे. शांघायमधील फुदन विद्यापीठातील शल्यचिकित्सक आणि शास्त्रज्ञ यिलाई शू यांच्या मते, सुरुवातीला आम्हाला थोडी चिंता होती. उपचार यशस्वी होतील की नाही याची चिंता होती. गेल्या वर्षी डिसेंबरपासून उपचार सुरू झाले. त्यानंतर आतापर्यंत कधीच न बोललेला एक लहान मुलगा आई आणि बाबा म्हणून हाक मारू लागला.

जनुकाच्या दोन सदोष प्रतींचा परिणामसंशोधनात सहभागी असलेल्या सर्व चिनी मुलांना ऐकू येत नव्हते. कारण त्यांना वारशाने दोषपूर्ण जनुके मिळाली होती. हे जनुक शरीर ‘ओटोफेर्लिन’ प्रथिने  कसे बनवते हे ठरवते. हे प्रथिन आतील कानाला मेंदूपर्यंत आवाज पोहोचवण्याची क्षमता देते. एका मुलीला पूर्वी कॉक्लियर इम्प्लांट झाले होते, ज्यामुळे तिला ऐकू आणि बोलता आले. पण चाचणीनंतर ती स्वाभाविकपणे ऐकूही लागली. 

- १.१ अब्ज तरुणांची ऐकण्याची क्षमता मनोरंजन आणि वैयक्तिक ऑडिओ उपकरणांच्या अतिवापरामुळे कमी होण्याचा धोका आहे.

- २०५० पर्यंत १० पैकी एका व्यक्तीची श्रवणशक्ती कमी होण्याची भीती आहे.

- १-३% जगभरातील लोक ओटोफर्लिन जनुक दोषाने बाधित आहेत, त्यांना ऐकण्याची क्षमता नाही. 

- ६०-६५% ऐकण्याची क्षमता नवीन प्रयोगामुळे येते.

- ८०% बहिरे लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांमध्ये राहतात.

टॅग्स :Healthआरोग्यchinaचीन