जगाच्या कानाकोपऱ्यात महागडे सॅटेलाइट इंटरनेट पोहोचवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक' कंपनीला पापुआ न्यू गिनीमध्ये मोठा धक्का बसला आहे. परवाना आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यावरून तेथील सरकारने स्टारलिंकची सेवा तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
स्टारलिंकने पापुआ न्यू गिनीमध्ये आपली सेवा सुरू केली होती, मात्र त्यांना अद्याप सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली नव्हती. आश्चर्याची बाब म्हणजे, देशात स्टारलिंकचे टर्मिनल विकले जात होते आणि लोक सबस्क्रिप्शनही घेत होते. यावर कारवाई करत तेथील नॅशनल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी अथॉरिटीने कंपनीला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृतपणे स्टारलिंक छोटा देश आहे काय वाकडे करणार या अविर्भावात स्टारलिंकची सेवा देण्यास सुरुवात केली होती. परंतू, स्टारलिंकला आता या देशासमोर झुकावे लागले आहे.
पापुआ न्यू गिनीच्या सरकारने स्टारलिंकच्या सेवेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा वाद आता न्यायालयात पोहोचला असून, जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही, तोपर्यंत सेवा बंदच राहणार आहे. दुसरीकडे, तेथील नागरिक मात्र स्वस्त आणि वेगवान इंटरनेटसाठी स्टारलिंकची सेवा सुरू व्हावी, अशी मागणी करत आहेत. या संबंधीच्या याचिकेवर २०० लोकांनी सह्या केल्या आहेत.
भारतात काय स्थिती आहे? भारतातही स्टारलिंकच्या सेवेची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून केली जात आहे. नुकतेच स्टारलिंकच्या वेबसाईटवर भारतीय युजर्ससाठी प्लॅन्स लाईव्ह झाले होते, पण तांत्रिक त्रुटीमुळे असे झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मात्र, २०२६ पर्यंत भारतात स्टारलिंक अधिकृतपणे लाँच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : Papua New Guinea halted Starlink due to licensing issues, despite public demand. India awaits Starlink, possibly by 2026, after plan glitches.
Web Summary : लाइसेंसिंग मुद्दों के कारण पापुआ न्यू गिनी ने स्टारलिंक को रोका, जनता की मांग के बावजूद। भारत को स्टारलिंक का इंतजार, 2026 तक संभव, योजना में गड़बड़ियों के बाद।