शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

चोराची झाली फजिती , विचित्रपणे खिडकीत अडकून पडला ७ तास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 12:53 PM

बरमिंघम - एखाद्याच्या घरी चोरी करायला गेलेले चोर वेगवेगळ्या कारणांनी पकडले गेल्याचे आपण अनेकदा वाचतो. कोणी कशात अडकून पडतो तर कोणी दुखापत होऊन तिथेच चक्कर येऊन पडतो. पण यापेक्षाही एक विनोदी किस्सा घडला आहे, इंग्लडमधल्या बरमिंघम शहरात. एका हॉटेलमध्ये चोरी करायला एक चोरटा चक्क खिडकीत तब्बल ७ सात अडकून राहिला. शेवटी तेथे जाणाऱ्या ...

ठळक मुद्देएखाद्याच्या घरी चोरी करायला गेलेले चोर वेगवेगळ्या कारणांनी पकडले गेल्याचे आपण अनेकदा वाचतो. कोणी कशात अडकून पडतो तर कोणी दुखापत होऊन तिथेच चक्कर येऊन पडतो. पण यापेक्षाही एक विनोदी किस्सा घडला आहे

बरमिंघम - एखाद्याच्या घरी चोरी करायला गेलेले चोर वेगवेगळ्या कारणांनी पकडले गेल्याचे आपण अनेकदा वाचतो. कोणी कशात अडकून पडतो तर कोणी दुखापत होऊन तिथेच चक्कर येऊन पडतो. पण यापेक्षाही एक विनोदी किस्सा घडला आहे, इंग्लडमधल्या बरमिंघम शहरात. एका हॉटेलमध्ये चोरी करायला एक चोरटा चक्क खिडकीत तब्बल ७ सात अडकून राहिला. शेवटी तेथे जाणाऱ्या पादचाऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले.

इंग्लडमधल्या बरमिंघममध्ये एका हॉटेलमध्ये मध्यरात्री एक चोर चोरी करायला गेला. नेहमीप्रमाणे त्याने चोरीसाठी हॉटेलचा मागच्या गेटचा वापर करायचं ठरवलं. मागच्या बाजूने खिडकीतून आत प्रवेश करताना तो तेथेच अडकला. पण तो अशा पद्धतीने अडकला की त्याला तेथून बाहेर पडताच येईना. खिडकीच्या आत त्याचं डोकं आणि खिडकीच्या बाहेर त्याचे पाय लटकत होते. त्यामुळे त्याला उठता येत नव्हतं. ए‌वढच काय तर त्याला हालचालही करता येत नव्हती.

हॉटेलमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न त्याने रात्रीच्या वेळी केला होता, त्यामुळे परिसरात वर्दळही कमी होती. रस्त्यावर माणसंही नव्हती. तो मदतीसाठी हाक मारत होता. मात्र तेथे कोणीच नसल्याने त्याची हाक कोणापर्यंत पोहोचलीच नाही. अशा अवस्थेत तो तब्बल ७ सात होता. शेवटी तेथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. तो ज्याप्रमाणे खिडकीत अडकला होता हे पाहून सुरुवातीला तेथील पादचाऱ्यांना हसूच आवरता आले नाही. मात्र त्याला मदत करायला पाहिजे या हेतूने त्यांनी पोलिसांना बोलावले.

पोलीस तेथे पोहोचल्यावर त्याला बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात आले. शेवटी त्याला बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा फोटो तेथील वेस्ट मिडलँड्स पोलीसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. चोरी करण्याचा प्रयत्न त्या चोराच्याच अंगलट आल्याने अनेकांनी हा फोटो रिट्वीट करत अनेक विनोद शेअर केले आहे. 

सौजन्य - www.ndtv.com

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयThiefचोरCrimeगुन्हाAccidentअपघात