शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

'ते' 13 जण, 90 कमांडो अन् 432 तासांचा थरार... थायलंडमधील 'रेस्क्यू ऑपरेशन'ची 'अंदर की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:06 PM

उत्तरी थायलंडच्या थाम लुआंग या गुहेत हे 13 जण पोहचले. मात्र, मुसळधार पावसामुळे गुहेतून बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हते.

माए साई - थायलंडचा अंडर 16 फुटबॉल संघ आणि त्यांचे प्रशिक्षक 23 जून रोजी एका गुहेत अडकले. फुटबॉलच्या सरावानंतर उत्तरी थायलंडच्या थाम लुआंग या गुहेत हे 13 जण पोहचले. मात्र, मुसळधार पावसामुळे गुहेतून बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे पाण्यापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी या 13 जणांनी गुहेमध्ये 4 किमी आत प्रवेश केला. माध्यमांमध्ये ही बातमी पसरताच थायलंडने मिशन सेव्ह चाईल्स सुरु केले. पण, अतिशय कठिण ठरणाऱ्या या मोहिमेला फत्ते करण्यासाठी संपूर्ण जग एकवटले. तब्बल 432 तासांच्या थरारक ऑपरेशननंतर हे मिशन यशस्वी झाले. दुर्दैवाने ही मोहिम फत्ते करताना एका नेव्ही अधिकाऱ्याला वीरमरण प्राप्त झाले.

थाम लुआंग येथील अडकलेल्या फुटबॉल संघाची बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली. त्यामुळे, 2 जुलै रोजी साऊथ अँड मिड वेल्स केव्ह रेस्क्यू टीमचे सदस्य व ब्रिटीश डायव्हर्स (रेस्कू टीमचे कमांडो) रिचर्ड स्टैनन आणि जॉन वॉलैनथन यांनी गुहेतील मुलांना शोधून काढले. गेल्या अनेक दिवसांपासून पोटात अन्न नसल्याने सर्वच मुले अशक्त झाली होती. मात्र, डायव्हर्संना पाहून या मुलांच्या जीवात जीव आला. गुहेतील पाण्याची स्थिती पाहून सर्वप्रथम या मुलांना पावसाळा संपेपर्यंत गुहेतच राहावे लागेल, असे सांगण्यात आले. पण, गुहेत वाढणारा पाण्याचा जोर आणि कार्बनडय ऑक्साईडचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन, तसे झाल्यास सर्वच मुले मृत्यूमुखी पडण्याची भीती होती. त्यामुळे 8 जुलै रोजी बचाव पथकाने 'करो या मरो' मोहीम हाती घेतली. आपल्या जीवाची बाजी लावून जगभरातील 90 डायव्हर्संने या गुहेत प्रवेश केला. त्यामध्ये थायलंडचे 40 तर इतर देशांतील 50 जणांचा सहभाग होता. मुलांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना ऑक्सीजन टॅँक आणि डाईव्ह मास्क देण्यात आले होते. या गुहेतील एका ठिकाणी रेस्क्यू टीमने आपला सुरक्षित चेंबर 3 म्हणजे एक बेस तयार केला होता. सुरुवातीला या सर्वांना सुरक्षित चेंबर 3 वर आणण्यात आले. तेथे काही काळ आराम केल्यानंतर 12 मुलांसह त्यांच्या प्रशिक्षकांना गुहेतून बाहेर काढले गेले. मुलांनी गुहेतून बाहेर येताच गुहेबाहेर अश्रूंचा बाध फुटला. मुसळधार पावसातही आई-वडिलांच्या डोळ्यांतून निघणारे अश्रू स्पष्ट दिसते होते. आपल्या जीवाची पर्वा न करता 90 बहाद्दर डायव्हर्सने आपले मिशन पूर्ण केले होते. रेस्क्यू पथकातील प्रत्येक डायव्हर्सच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद झळकत होता. मात्र, या मिशनमध्ये 6 जुलै रोजी 38 वर्षीय माजी थायलंडचे माजी नेव्ही सील कमांडर समन गुनान यांना गुहेत वीरमरण प्राप्त झाले होते. आपल्या देशातील फुटबॉलचं भवितव्य वाचवण्यासाठी या कमांडोने आपला जीव गमावला.

या रेस्क्स्यू ऑपरेशनच्या प्रमुखांनी या टीमला संयुक्त राष्ट्र टीम असे नाव दिले होते. एका देशावरील संकटाचा सामना जगातील सर्वच देशांकडून करण्यात येत असल्याचे यातून दिसले. या मोहिमेत यूके, चीन, म्यानमार, लाओस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जापान आणि इतर देशांमधील डायव्हर्संचा सहभाग होता. तर, भारताली सांगलीच्या प्रसाद कुलकर्णी यांच्या टीमनेही या मोहिमेत महत्त्वाजी भूमिका बजावली. दरम्यान, मंगळवारी Thai cave rescue या शब्दाने गुगलवर 35.90 कोटी नेटिझन्सने सर्च केले. यावरुन जगभरातील नागरिक या घटनेबाबत किती जागरुक होते आणि या मुलांची चिंता जगभरातील लोकांना लागली असल्याचे दिसून येते.

टॅग्स :ThailandथायलंडFootballफुटबॉल