त्यांनी उभ्यांनीच केला विमानप्रवास

By Admin | Updated: February 26, 2017 21:31 IST2017-02-26T21:31:07+5:302017-02-26T21:31:07+5:30

तुम्ही आतापर्यंत बस, टेम्पो, लोकल, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या यातून उभ्याने प्रवास करणारे प्रवासी पाहिले असतील. पण आता चक्क

They did the same plane | त्यांनी उभ्यांनीच केला विमानप्रवास

त्यांनी उभ्यांनीच केला विमानप्रवास

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 -  तुम्ही आतापर्यंत बस, टेम्पो, लोकल, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या यातून उभ्याने प्रवास करणारे प्रवासी पाहिले असतील. पण आता चक्क विमानातूनच काही प्रवाशांनी उभ्याने प्रवास केल्याची घडना घडली आहे. आपल्या चित्रविचित्र वर्तनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या विमानात हा प्रकार घडला आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की,  पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या सौदी अरेबियाला जाणाऱ्या एका विमानातील प्रावासी संख्या फूल झाली होती. त्यावेळीच अजून सात प्रवाशांना या विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. अखेर या प्रवाशांनी विमानातून उभ्यानेच प्रवास केला. हा प्रकार 20 जानेवारी रोजी घडला होता. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने एका वृत्तसंस्थेला माहिती दिल्यानंतर या घटनेस दुजोरा मिळाला आहे.  
आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानात उभ्याने प्रवास करत असलेल्यांबाबत वैमानिकालाही कल्पना नव्हती, तसेच आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास या प्रवाशांसाठी अतिरिक्त ऑक्सिजन मास्क आणि सुरक्षा यंत्रेही नव्हती. या संदर्भातील वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान, पाकिस्तान एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने या संदर्भात चौकशी सुरू असून चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. 

Web Title: They did the same plane