व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या कारवाईला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वेग येत असल्याचे दिसून येत आहे. चीनसह अनेक देश अमेरिकेच्या या कारवाईवर टीका करत आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हणत आहेत. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढील पावलाबाबत अटकळ सुरू झाली आहे. इतर अनेक देशही त्यांच्या नजरेत असू शकतात.
ट्रम्प ग्रीनलँड, कोलंबिया, क्युबा, मेक्सिको आणि इराणला लक्ष्य करत असल्याचे म्हटले जाते. त्यांनी अधिकृतपणे हे सांगितले नसले तरी, त्यांनी काही दिवसापूर्वी या नावांचा उल्लेख केला आहे. सध्या, मादुरो विरुद्ध अमेरिकेतील न्यायालयात खटला सुरू आहे, तिथे व्हेनेझुएलाच्या नेत्याने दोषी नसल्याची कबुली दिली आहे. त्यांचे अपहरण केल्याचा दावा केला आहे.
ग्रीनलँड
रविवारी ट्रम्प यांनी सांगितले की, आर्क्टिक प्रदेशात रशिया आणि चीनच्या वाढत्या उपस्थितीमुळे ग्रीनलँड अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. अमेरिकेला ग्रीनलँडची गरज आहे कारण ते सध्या एक अतिशय धोरणात्मक स्थान आहे, तिथे सर्वत्र रशियन आणि चिनी जहाजे तैनात आहेत. ट्रम् यांनी सांगितले की त्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रीनलँडची आवश्यकता आहे आणि डेन्मार्क ते हाताळू शकणार नाही. युरोपियन युनियन देखील त्यांच्या मताचे समर्थन करते आणि त्यांना याची जाणीव आहे.
इराण
ट्रम्प यांनी इराणला चालू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाच्या दडपशाहीबद्दल इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी काल माध्यामांना सांगितले की, "आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जर त्यांनी पूर्वीसारखे लोकांना मारायला सुरुवात केली तर मला वाटते की अमेरिका त्यांच्यावर कठोर कारवाई करेल."
कोलंबिया
ट्रम्प यांनी मध्य अमेरिकेतील आणखी एक देश असलेल्या कोलंबियावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, कोलंबिया आणि व्हेनेझुएला हे दोन्ही "खूप आजारी" देश आहेत. त्यांनी कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांचा उल्लेख करून म्हटले की कोलंबिया "कोकेन तयार करून अमेरिकेला विकण्यास आवडणाऱ्या आजारी माणसाद्वारे चालवले जाते. ते फार काळ ते करू शकणार नाही.
क्युबा
क्युबा या देशाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिकेच्या हस्तक्षेपाची गरज नाही कारण हा देश स्वतःहून कोसळत आहे. "क्युबा कोसळण्यास तयार आहे. अमेरिकन अध्यक्ष म्हणाले, "क्युबाकडे आता उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. त्यांना त्यांचे सर्व उत्पन्न व्हेनेझुएलातून, व्हेनेझुएलाच्या तेलातून मिळत होते. आता त्यांना त्यातून काहीही मिळत नाही. क्युबा अक्षरशः कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे.
मेक्सिको
ट्रम्प म्हणाले की, मेक्सिकोने आपल्या व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे कारण त्या देशात ड्रग्जचा पूर येत आहे आणि अमेरिकेने त्याबद्दल काहीतरी करायला हवे. त्यांनी मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांचे वर्णन एक अद्भुत व्यक्ती म्हणून केले. जेव्हा जेव्हा त्यांनी क्लॉडिया शेनबॉम यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी मेक्सिकोमध्ये सैन्य पाठवण्याची ऑफर दिली.
Web Summary : Following Venezuela action, speculation rises about Trump's next targets. Greenland, Iran, Colombia, Cuba, and Mexico are reportedly on his radar due to security, internal issues, and drug concerns. Tensions escalate globally.
Web Summary : वेनेजुएला पर कार्रवाई के बाद, ट्रम्प के अगले लक्ष्यों के बारे में अटकलें तेज हैं। सुरक्षा, आंतरिक मुद्दों और दवा चिंताओं के कारण ग्रीनलैंड, ईरान, कोलंबिया, क्यूबा और मेक्सिको पर नजर है। वैश्विक स्तर पर तनाव बढ़ रहा है।