उडणारी कारही आली

By Admin | Updated: April 23, 2017 00:41 IST2017-04-23T00:41:59+5:302017-04-23T00:41:59+5:30

उडणारी कार आतापर्यंत चर्चेचाच विषय होती, पण पोर्तुगालच्या एका कंपनीने अशी एक कार तयार केली आहे, जी रस्त्यांवरही धावते आणि उडूही शकते.

There was a flying car | उडणारी कारही आली

उडणारी कारही आली

उडणारी कार आतापर्यंत चर्चेचाच विषय होती, पण पोर्तुगालच्या एका कंपनीने अशी एक कार तयार केली आहे, जी रस्त्यांवरही धावते आणि उडूही शकते. या कारला तीन चाके आहेत. कारच्या वर हेलिकॉप्टरसारखा फोल्डिंगचा पंखा आहे. यात १०० हॉर्स पॉवरचे दोन इंजिन आहेत. ही कार हवेत १७७ किमी प्रति तास आणि रस्त्यावर १६१ किमी प्रति तास या वेगाने धावते. रस्त्यावरून हवेत उडण्यासाठी या कारला दहा मिनिटे लागतात. पायलटसह यात दोन लोक बसतात. या कारची किंमत आहे, आपले अडीच कोटी रुपये.

Web Title: There was a flying car