शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

भारताकडून कोणताही धोका नाही, अमेरिकेचं पाकिस्तानला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 20:27 IST

अमेरिकेनं दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत पाकिस्तानला देऊ केलेल्या मदतीवर टाच आणली. त्यानंतर आता अमेरिकेनं पाकिस्तानला भारताकडून कोणताही धोका नसल्याचं आश्वासन दिलं आहे.

इस्लामाबाद- अमेरिकेनं दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत पाकिस्तानला देऊ केलेल्या मदतीवर टाच आणली. त्यानंतर आता अमेरिकेनं पाकिस्तानला भारताकडून कोणताही धोका नसल्याचं आश्वासन दिलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर खान असे म्हणाले आहेत. तसेच पाकिस्ताननं भारताबाबतच्या स्वतःच्या रणनीतीत सकारात्मक बदल करायला हवा, असंही अमेरिकेचं मत आहे. पाकिस्ताननं अमेरिकेशी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असं विधान खुर्रम दस्तगीर खान यांनी केलं आहे. कठोर भूमिका सोडून टेबलावर सर्व प्रकरणं ठेवून ती समोपचारानं सोडवण्याची गरज आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमधील गैरसमज दूर होतील, असंही खुर्रम दस्तगीर खान यांनी स्पष्ट केलं आहे. 

दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकने पाकिस्तानला दणका दिला होता. पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली होती. 'पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकी नागरिकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही, तोपर्यंत अमेरिका पाकिस्तानला कोणतेही सुरक्षा सहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते. मात्र, रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल', असेही हीथर नोर्ट यांनी सांगितले.अमेरिकेनं दिला होता इशाराव्हाइट हाउसच्या प्रसारमाध्यम सचिव साराह सँडर्स यांनी सांगितले की, दहशतवादी कारवाया थांबविण्यासाठी पाकने आणखी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे पाकवर दबाव वाढविण्यासाठी अमेरिका आणखी निर्बंध लादणार आहे. गेल्या पंधरा वर्षांत अमेरिकेने पाकला केलेली ३३ अब्ज डॉलरची मदत हा मूर्खपणा होता. या काळात पाक मात्र अमेरिकेशी खोटेपणाने व कपटी वृत्तीने वागला, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकेने पाकची २५५ दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत रोखली आहे.  

टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादIndiaभारत