शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:32 IST

या घटनेसंदर्भात बोलताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, "हिंदू आणि बौद्ध देवतांना संपूर्ण प्रदेशात अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजले जाते आणि हा आपल्या सामायिक सभ्यतेचा वारसा आहे. प्रादेशिक वादांमुळे, जेव्हा अशी कृत्यं होतात, तेव्हा श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या जातात."

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरू थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती तोडल्याची घटना घडली आहे. या घटनेवर भारताने कठोर शब्दांत चिंता व्यक्त केली असून, अशा कृत्यांमुळे जगभरातील भाविकांच्या भावना दुखावल्या जातात, असे म्हटले आहे. यावर थायलंडने, "ही मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित केली होती, ते स्थळ धार्मिक कार्यासाठी अधिकृतपणे नोंदणीकृत नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे. 

मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...; थायलंडची प्रतिक्रिया -यासंदर्भात स्पष्टिकरण देताना थाई-कंबोडियन बॉर्डर प्रेस सेंटरने म्हटले आहे की, "ही मूर्ती ज्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती, ते ठिकाण धार्मिक कार्यासाठी अधिकृतपणे नोंदणीकृत नव्हते. मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण होते. आपण हिंदू धर्मासह सर्वच धर्माचा आदर करतो. थायलंडच्या मते, ही मूर्ती नंतरच्या काळात स्थापित करण्यात आली होती आणि कंबोडिया या मूर्तीचा वापर वादग्रस्त जमिनीवर आपला दावा सांगण्यासाठी करत होता. जर ही मूर्ती हटवली नसती, तर संवेदनशील सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता होती. 

काय म्हणाला भारत -या घटनेसंदर्भात बोलताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, "हिंदू आणि बौद्ध देवतांना संपूर्ण प्रदेशात अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजले जाते आणि हा आपल्या सामायिक सभ्यतेचा वारसा आहे. प्रादेशिक वादांमुळे, जेव्हा अशी कृत्यं होतात, तेव्हा श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या जातात." दरम्यान, दोन्ही देशांनी हा सीमावाद संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवायला हवा, असे आवाहनही यावेळी जायसवाल यांनी केले.

दुसऱ्या बाजूला कंबोडियानेही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रीह विहार प्रांताचे प्रवक्ते किम चानपनहा यांनी दावा केला की, ही मूर्ती २०१४ मध्ये थायलंडच्या सीमेपासून १०० मीटर दूर कंबोडियाच्या हद्दीत उभारण्यात आली होती, जी थायलंडने बेकायदेशीरपणे पाडली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thailand clarifies Vishnu statue demolition wasn't religious, but security-related.

Web Summary : Thailand claims the Vishnu statue demolition on the Cambodian border wasn't religiously motivated but due to security concerns. India expressed concern, while Cambodia condemned the act, claiming the statue was legally within its territory. Thailand stated the site lacked official religious registration, and the statue risked escalating border tensions.
टॅग्स :IndiaभारतThailandथायलंड