शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:38 IST

भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही...

पहलगाम दहशतनादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, हा करार पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पाकिस्तानने भारताकडे विनवण्या करायलया सुरुवात केली. मात्र भारताने त्यांच्या या विनवण्यांना काडीचीही किंमत दिली नाही. यावर पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही. अखेर आता, पाकिस्तानने आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी नवी मार्ग शोधला आहे, मात्र यालाही, यापूर्वीच भारतासह स्थानिकांनीही विरोध दर्शवलेला आहे.

आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी, त्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पाकिस्तानने आता आपली पाणी साठवण क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी (१ जुलै २०२५) भारतावर पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत असल्याचा आरोप केला आणि म्हणाले, सरकारने पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, डायमर भाषा धरण आणि इतर संसाधनांचा वापर करून, वादग्रस्त नसलेली पाणी साठवण क्षमता निर्माण केली जाईल.

कुठे तयार होतोय डायमर भाषा धरण? -डायमर भाषा धरण हे खैबर पख्तूनख्वातील कोहिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील डायमर जिल्ह्यांदरम्यान बांधले जात आहे. त्याचे बांधकाम इम्रान खान सरकारच्या काळातच सुरू झाले होते. मात्र, यावर भारताने आक्षेप घेतला आहे. कारण हे धरण बेकायदेशीर भागात बांधले जात होते. एवढेच नाही तर, स्थानिक लोकांचाही या धरणाला विरोध आहे. जोवर त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोवर धरण बांधू दिले जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, १९९१ मध्ये प्रांतांमध्ये झालेल्या पाणी करारात पाण्याची क्षमता वाढवण्याची तरतूद आहे. आम्ही आमच्या संसाधनांचा वापर करून पुढील वर्षापर्यंत या धरणाचे काम पूर्ण करू, असेही शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला