लपून व्हिडीओ बनवत होता तरुण, ब्लॅकबेल्ट तरुणीने केला पाठलाग, पकडलं आणि केली धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 14:56 IST2022-09-16T14:56:12+5:302022-09-16T14:56:43+5:30
International News: बाथरुममध्ये गेलेल्या तरुणीचा व्हिडीओ बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. आपला व्हिडीओ बनवत असल्याचा संशय येताच तरुणीने या तरुणाचा पाठलाग केला. त्यानंतर त्याला पकडून त्याची जोरदार धुलाई केली. ही

लपून व्हिडीओ बनवत होता तरुण, ब्लॅकबेल्ट तरुणीने केला पाठलाग, पकडलं आणि केली धुलाई
बँकॉक - बाथरुममध्ये गेलेल्या तरुणीचा व्हिडीओ बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. आपला व्हिडीओ बनवत असल्याचा संशय येताच तरुणीने या तरुणाचा पाठलाग केला. त्यानंतर त्याला पकडून त्याची जोरदार धुलाई केली. ही तरुणी तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार चाचोएंगसाओ प्रांतामध्ये एक थाई तरुण महिलांच्या सार्वजनिक बाथरुममध्ये घुसला. तिथे लपून तो तरुणीचा व्हिडीओ काढू लागला. तेवढ्यात तरुणीने त्याच्या पायातील चपला पाहिल्या. तिला संशय आल्याने ती ओरडत बाहेर आली.
त्यामुळे भांबावलेला तरुण तिथून पळाला. मात्र तरुणीने त्याचा पाठलाग केला. तो तरुण बाईकवरून पळणारच होता, तेवढ्यात या तरुणीने त्याला पकडले. त्यानंतर तरुणीने त्याची बेदम धुलाई केली. सदर तरुणाने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर तरुणी तायक्वांडोमध्ये ब्लॅकबेल्ट होती. अशा परिस्थितीत तरुणाला काहीच करता आलं नाही.
ही तरुणी जेव्हा या तरुणाची धुलाई करत होती, तेव्हा आजूबाजूला काही लोक उपस्थित होते. मात्र या महिलेने या रंगेल तरुणाला चांगलीच अद्दल घडवली. हा प्राकर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. तेव्हा सदर तरुण हातापाया पडून माफी मागत होता.