तापमान एवढे वाढले, समुद्रकिनारे लोकांनी खचाखच भरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 06:47 IST2024-03-21T06:46:54+5:302024-03-21T06:47:07+5:30
तापमान वाढल्याने इपनेमा आणि कोपाकाबाना समुद्रकिनारे लोकांनी खचाखच भरले आहेत.

तापमान एवढे वाढले, समुद्रकिनारे लोकांनी खचाखच भरले
ब्राझीलमध्ये उष्णतेच्या लाटेने नवा विक्रम प्रस्थापित केला असून रिओ दी जनेरोचा उष्मा निर्देशांक तब्बल ६२.३ अंश सेल्सिअसपर्यंत (१४४.१ अंश फॅरेनहाइट) नोंदवला गेला. ही नोंद दशकातील सर्वाधिक आहे, असे हवामान विभागाने सांगितले. तापमान वाढल्याने इपनेमा आणि कोपाकाबाना समुद्रकिनारे लोकांनी खचाखच भरले आहेत.
उष्णता निर्देशांक आर्द्रता लक्षात घेऊन तापमान कसे वाटते हे मोजतो. सोमवारी शहरातील वास्तविक कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस होते, असे रिओ हवामान विभागाने सांगितले. पश्चिम रिओमध्ये रविवारी सकाळी ९.५५ वाजता ६२.३ अंश सेल्सिअस उष्मा निर्देशांकाची नोंद झाली.
या केंद्रात २०१४ पासून नोंदी ठेवणे सुरू झाल्या. तेव्हापासूनचे हा सर्वाधिक उष्मा निर्देशांक ठरला. मागील उष्मा निर्देशांकाचा विक्रम नोव्हेंबरमध्ये ५९.७ अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला होता. इकडे नागरिकांची लाहीलाही होत असताना अतिवृष्टीने देशाच्या दक्षिण भागात कहर केला आहे.