लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 17:49 IST2025-07-23T17:47:43+5:302025-07-23T17:49:04+5:30

जगभरातील लोकसंख्या गेल्या ६५ वर्षांत जगाची लोकसंख्या तीन अब्जावरून आठ अब्ज झाली. पंरतु,...

The population is continuously decreasing! Only 9 thousand people are left in 'this' country! | लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले

लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले

जगभरातील लोकसंख्या गेल्या ६५ वर्षांत जगाची लोकसंख्या तीन अब्जावरून आठ अब्ज झाली. पंरतु, जगात असे काही देश आहेत, जिथे लोकांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. एवढेच नाही तर, तुवालू नावाच्या देशाचे अस्तित्व धोक्यात आहे. या देशात १० हजारांहून कमी लोक उरले आहेत आणि त्यातही घट सुरू आहे.

दरम्यान, २०११ मध्ये जगाची लोकसंख्या ७ अब्ज होती आणि फक्त १४ वर्षांत ही संख्या एक अब्जाने वाढली. संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, २०३० पर्यंत जगाची लोकसंख्या ८.६ अब्ज होईल. त्यानंतर २०५० पर्यंत ही संख्या ९.८ अब्जाचा आकडा गाठेल. तर, २१०० मध्ये जगातील लोकसंख्या ११.२ अब्जापर्यंत पोहोचेल. जगातील लोकसंख्येत वाढ होत असताना युक्रेन, जपान आणि ग्रीस यांसारख्या देशांतील लोकसंख्येत झपाट्याने घट होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  तुवालू हा ऑस्ट्रेलिया आणि हवाई यांच्यातील एक बेट देश आहे. तुवालू देशातील लोकसंख्येत फक्त १.८० टक्क्यांनी कमी झाली, ९ हजार लोक उरले आहेत. युरोपियन देश ग्रीसची लोकसंख्याही कमी होत आहे आणि एका दिवसात एकूण १.६० टक्के घट नोंदवली गेली. तर, सॅन मारिनोची लोकसंख्या १.१० टक्क्यांनी कमी झाली. भूपरिवेष्ठित कोसोव्होची लोकसंख्याही १ टक्क्यांनी कमी झाली. रशियाच्या शेजारील देश बेलारूसच्या लोकसंख्येत ०.६० टक्क्यांनी घट झाली. बोस्निया आणि अल्बानियाची लोकसंख्याही तेवढीच घटली.

युद्धाचा युक्रेनवर परिणाम
जपानमधील लोकसंख्येत अर्धा टक्के घट नोंदवली गेली. इतर देशांमध्ये स्थलांतर आणि कमी जन्मदरामुळे जपानमधील लोकसंख्या कमी होत आहे. युक्रेनमधूनही मोठ्या संख्येने लोक आश्रयासाठी इतर देशांमध्ये गेले आहेत. याशिवाय, आतापर्यंत युद्धात हजारो लोक मारले गेले आहेत. अशाप्रकारे, युक्रेन हा जगातील सर्वात वेगाने कमी होणारी लोकसंख्या असलेला देश आहे.

आशियातील देशांतील लोकसंख्येत मोठी वाढ
युरोपची लोकसंख्या वेगाने कमी होत आहे. हा एकमेव असा खंड आहे. तर आशियाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. चीन, भारत, पाकिस्तान, इंडोनेशियासारखे देश आशियामध्येच आहेत, ज्यांची लोकसंख्या सर्वात वेगाने वाढत आहे.

Web Title: The population is continuously decreasing! Only 9 thousand people are left in 'this' country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.