स्वत:ला 'व्हर्जिन' दाखवण्यासाठी खुलेआम केली जात होती 'व्हर्जिनीटी सर्जरी', सरकारने घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 04:19 PM2022-01-26T16:19:17+5:302022-01-26T16:28:09+5:30

Virginity Repair Surgery : या सर्जरीचा उद्देश असतो की, जेव्हा तरूणी किंवा महिला आपल्या पार्टनरसोबत संबंध ठेवेल तेव्हा रक्त वाहणं, मग त्यांनी आधी कुणासोबत संबंध ठेवले असेल तरी.

The obsession with virginity UK government moves to criminalize virginity repair surgery | स्वत:ला 'व्हर्जिन' दाखवण्यासाठी खुलेआम केली जात होती 'व्हर्जिनीटी सर्जरी', सरकारने घातली बंदी

स्वत:ला 'व्हर्जिन' दाखवण्यासाठी खुलेआम केली जात होती 'व्हर्जिनीटी सर्जरी', सरकारने घातली बंदी

Next

Virginity Repair Surgery : ब्रिटनमध्ये (UK) स्वतंत्र आयुष्य जगण्याची सवय असलेल्या तरूणी कमी वयातच व्हर्जिनीटी गमावतात. अशात जेव्हा त्यांचं लग्न होतं तेव्हा अलिकडे तरूणी 'व्हर्जिनीटी सर्जरी' (Virginity Repair Surgery)चा आधार घेऊ लागल्या आहेत. जेणेकरून त्यांना हे सिद्ध करता यावं की, त्या व्हर्जिन आहेत. या ट्रेन्डवर सरकारने आता यावर बॅन करण्यासाठी संसदेत कायदा सादर केला आहे.

WION वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटिश सरकारकडून 'व्हर्जिनीटी रिपेअर' सर्जरी, ज्याला हायमेनोप्लास्टी नावाने ओळखलं जातं. हा गुन्हा बनवण्यासाठी एक कायदा तयार केला आहे. सोमवारी सादर केलेल्या आरोग्य देखरेख बिलाच्या संशोधनानुसार कोणतीही प्रक्रिया जी हायमनच्या पुनर्निर्माणाचा प्रयत्न केला तर ते बेकायदेशीर असेल. भलेही सर्जरी करणाऱ्या व्यक्तीची सहमती असो वा नसो.

ब्रिटनच्या क्लीनिकमध्ये खाजगी हॉस्पिटल्स आणि फार्मसींमध्ये मोठ्या संख्येने व्हर्जिनीटी पुन्हा देण्याच दावा करणारी वादग्रस्त सर्जरी केली जाते. इथे मोठ्या संख्येने तरूणी ही सर्जरी करून पुन्हा व्हर्जिन बनत आहेत.

कशी केली जाते सर्जरी?

या सर्जरीचा उद्देश असतो की, जेव्हा तरूणी किंवा महिला आपल्या पार्टनरसोबत संबंध ठेवेल तेव्हा रक्त वाहणं, मग त्यांनी आधी कुणासोबत संबंध ठेवले असेल तरी. यात टिश्यूचा वापर करून फेक हायमनचा पडदा बनवला जातो. ज्यातून संबंध ठेवताना रक्त येऊ लागतं.

बंदी का आणली?

सरकारने गेल्या जुलैमध्ये कौमार्य परीक्षणाला गुन्हा घोषित केलं होतं. त्यामुळे डॉक्टर आणि नर्सेसनी 'व्हर्जिनीटी रिपेअर' सर्जरीला बेकायदेशीर घोषित करण्याचं आवाहन केलं होतं.  डॉक्टरांनुसार, तरूणी या सर्जरी यासाठीही करतात कारण त्यांना त्यांच्या पतीला हे माहीत होऊ द्यायचं नसतं की, त्यांनी लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवले आहेत. ही सर्जरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी ५० ते ६० हजार रूपये खर्च येतो. या सर्जरीला अर्ध्या तासाचा वेळ लागतो.
 

Web Title: The obsession with virginity UK government moves to criminalize virginity repair surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.