शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"इराण युद्धाचा परिणाम क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार नाही, तर...!"; अमेरिका-इस्रायलला रशियाचा इशारा, केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 20:46 IST

सध्याच्या परिस्थितीत अण्वस्त्र प्रसाराचा विषय नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढला असल्याचे, लावरोव्ह यांनी म्हटले आहे.

मिडल ईस्टमध्ये सातत्याने वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाने जागतिक अणुधोक्यासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. रशिया अण्वस्त्र प्रसारबंदीच्या (Nuclear Non-Proliferation) तत्त्वांवर ठाम आहे आणि त्याचे समर्थन करत राहील. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अण्वस्त्र प्रसाराचा विषय नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढला असल्याचे, लावरोव्ह यांनी म्हटले आहे.

तर इतर अरब राष्ट्रेही अण्वस्त्रे मिळवण्याचे प्रयत्न तीव्र करू शकतात -लावरोव्ह म्हणाले, आता जग अशा वळणावर जाऊन पोहोचले आहे, जेथे नवी अण्वस्त्र स्पर्धा सुरू होऊ शकते. विशेषतः इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धामुळे ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. या संघर्षामुळे केवळ इराणच नाही, तर इतर अरब राष्ट्रे देखील आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अण्वस्त्रे मिळवण्याचे प्रयत्न तीव्र करू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

"जागतिक अणुधोका अधिक गंभीर होताना दिसत आहे" -रशियन परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणे आहे की, मिडल ईस्ट मधील या संघर्षाचा परिणाम केवळ या क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा जागतिक सुरक्षेवरही मोठा परिणाम होईल. सध्य स्थितीमुळे जागतिक अणुधोका अधिक गंभीर होताना दिसत आहे.

या वाढत्या तणावावर चीननेही यापूर्वीच आपली भूमिका मांडली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सर्व पक्षांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आणि युद्धाचा प्रसार शेजारील देशांमध्ये होण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War's Impact Beyond Region: Russia Warns US, Israel!

Web Summary : Russia warns Iran war could trigger nuclear proliferation. Other Arab nations may seek weapons. Global security threatened, says Russia. China urges de-escalation.
टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाIsraelइस्रायलwarयुद्धIranइराण