जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'पनामा कालवा' आता अमेरिका आणि चीनमधील संघर्षाचे नवे केंद्र बनला आहे. अमेरिकेचे प्रभावशाली सिनेटर मार्को रुबिओ यांनी चीनवर 'दडपशाही' करण्याचा गंभीर आरोप केला आहे. कालव्यात झालेल्या एका वादानंतर चीनने पनामाचा ध्वज असलेल्या जहाजांना रोखून धरल्याने आंतरराष्ट्रीय सागरी राजकारणात खळबळ उडाली आहे.
पनामा कालवा हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. जगातील एकूण सागरी व्यापाराचा मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो. अलीकडेच कालव्यात चिनी नियंत्रण असलेल्या बंदरांवर काही तांत्रिक आणि राजनैतिक खटके उडाले होते. याचा बदला म्हणून चीनने पनामाचा ध्वज असलेल्या जहाजांची तपासणी आणि हालचाली जाणीवपूर्वक रोखून धरल्याचा दावा रुबिओ यांनी केला आहे.
मार्को रुबिओ यांचा आरोप काय?सिनेटर रुबिओ यांच्या मते, चीन या कालव्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देत आहे. चीन आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून पनामासारख्या लहान देशांना दबावाखाली आणत आहे. कालव्याच्या दोन्ही टोकांकडील बंदरांचे व्यवस्थापन चिनी कंपन्यांकडे असल्याने अमेरिकन नौदलाच्या हालचालींवर चीन लक्ष ठेवू शकतो. चीन आपली 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' ही योजना पनामापर्यंत विस्तारून अमेरिकेच्या 'बॅकयार्ड'मध्ये शिरकाव करत आहे.
विवादाचे मूळ: हाँगकाँग कंपनीचा करार रद्दया वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा पनामाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका हाँगकाँग आधारित कंपनीचा दोन मोठ्या पोर्ट टर्मिनल्सचा करार रद्द केला. या बंदरांवर पुन्हा पनामाचे नियंत्रण आल्यामुळे चीन संतापला आहे. याचाच बदला म्हणून चीन पनामाच्या जहाजांवर कारवाई करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आकडेवारी काय सांगते? एपीच्या अहवालानुसार, मार्च महिन्यात चीनच्या बंदरांवर एकूण १२४ जहाजे रोखण्यात आली होती. त्यापैकी ९२ जहाजे (७५%) ही एकट्या पनामाच्या झेंड्याखालील होती. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत हा आकडा अचानक वाढल्याने, चीन जाणीवपूर्वक पनामाला टार्गेट करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ही जहाजे १ ते १० दिवसांपर्यंत रोखून धरल्याने शिपिंग उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे.
अमेरिकेची भूमिका आणि धोक्याचा इशारामार्को रुबिओ यांनी ट्रम्प प्रशासनाला या विषयावर कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. जर चीनने या महत्त्वाच्या जलमार्गावर नियंत्रण मिळवले, तर भविष्यात युद्ध किंवा तणाव निर्माण झाल्यास चीन अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पनामा हा जगातील जहाज नोंदणीचा सर्वात मोठा केंद्र आहे. या व्यवसायातून पनामाला दरवर्षी सुमारे १०० मिलियन डॉलर (८०० कोटींहून अधिक रुपये) कमाई होते. जर चीनने अशीच नाकेबंदी सुरू ठेवली, तर आंतरराष्ट्रीय कंपन्या पनामाचा झेंडा सोडून दुसऱ्या देशात नोंदणी करू शकतात, ज्याचा मोठा फटका पनामाच्या अर्थव्यवस्थेला बसेल.
Web Summary : Tensions escalate in Panama Canal as US accuses China of pressuring Panama by blocking ships. Senator Rubio warns of China's growing influence, posing a threat to US security. Dispute stems from a Hong Kong port deal cancellation, impacting global trade.
Web Summary : पनामा नहर में तनाव बढ़ा, अमेरिका ने चीन पर जहाजों को रोककर पनामा पर दबाव डालने का आरोप लगाया। सीनेटर रुबियो ने चीन के बढ़ते प्रभाव को लेकर चेतावनी दी, जिससे अमेरिकी सुरक्षा को खतरा है। विवाद हांगकांग पोर्ट डील रद्द होने से उपजा।