शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 20:16 IST

राजधानी काठमांडू आणि जवळपासच्या भागांत झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.

नेपाळमध्ये कथित भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. या निदर्शनादरम्यान निदर्शकांना दिसताच गोळी झाडण्याचा आदेश देणाऱ्या डीएसपीला निदर्शकांनी बेदम मारहाण करत ठार मारल्याचे वृत्त आहे. संबंधित डीएसपीनेच गोळीबाराचे आदेश दिले होते,  ज्यात १९ जणांचा मृत्यू झाला, असे निदर्शकांचे म्हणणे आहे. निदर्शकांच्या मृत्युनंतर नेपाळमधील परिस्थिती आणखीनच बिघडली.

हिंसक निदर्शनात मोठे नुकसान -देशभरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. राजधानी काठमांडू आणि जवळपासच्या भागांत झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. निदर्शकांनी संसद भवनालाही आग लावली. यानंतर, पंतप्रधान केपी शर्मा ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि गृहमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानांवरही निदर्शकांनी हल्ला केला आणि तोडफोड करत ते जाळून टाकले.

माजी पंतप्रधान झालानाथ खनल यांच्या घरावर हल्ला, पत्नीचा मृत्यू -निदर्शकांनी नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या यांच्या घरावरही हल्ला केला. हल्लेखोरांनी घराची तोडफोड केली आणि घराला आगही लावली. यावेळी खनाल यांची पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार घरातच होत्या. त्या गंभीर रित्या भाजल्या. त्यांना तातडीने कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यलक्ष्मी चित्रकार प्रचंड भाजल्या होत्या.

 

टॅग्स :NepalनेपाळagitationआंदोलनPoliceपोलिसDeathमृत्यू