बांग्लादेशमध्ये टीव्ही पत्रकाराचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:55 IST2024-08-28T16:54:54+5:302024-08-28T16:55:02+5:30
शेख हसीना यांच्या मुलाने या महिला पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणी देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक क्रूर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

बांग्लादेशमध्ये टीव्ही पत्रकाराचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला
बांग्लादेशमध्ये आताही हिंसाचार सुरु आहे. शेख हसीनांच्या पक्षाच्या नेत्यांना लोक शोधत असताना एका महिला टीव्ही पत्रकाराचा मृतदेह ढाक्यातील तलावात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ढाक्यातील हातिरझीलमध्ये या पत्रकाराचा मृतदेह सापडला आहे.
शेख हसीना यांच्या मुलाने या महिला पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणी देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक क्रूर हल्ला असल्याचे म्हटले आहे. सारा रहनुमा असे या महिला पत्रकाराचे नाव असून ती ३२ वर्षांची आहे. गाझी टीव्हीसाठी ती काम करत होती. न्यूजरूममध्ये काम करत असल्याने ती सर्वांसाठी परिचयाची होती. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह तलावावर तरंगताना दिसला होता.
या टीव्ही चॅनलची मालकी गोलम दस्तगीर गाजी यांच्याकडे आहे. त्यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. साराने मंगळवारी रात्री फहीम फैसल यांना टॅग करून एक पोस्ट केली होती.