डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच सर्वात मोठी घडामोड; एकाचवेळी ४०,००० सरकारी कर्मचारी राजीनामा देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:48 IST2025-02-06T11:48:00+5:302025-02-06T11:48:18+5:30
ट्रम्प प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना एकतर हे पॅकेज स्वीकारा किंवा स्वत:हून नोकरीचा राजीनामा द्या, असा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी ६ फेब्रुवारीपर्यंतची वेळ दिली होती.

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच सर्वात मोठी घडामोड; एकाचवेळी ४०,००० सरकारी कर्मचारी राजीनामा देणार
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होताच एवढ्या मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत की ज्या अमेरिकेच्या इतिहासात कधीही घडल्या नाहीत. ट्रम्पनी जगभरातील देशांनाही हादरे देण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या कारकिर्दीपेक्षा त्यांची दुसरी कारकीर्द प्रचंड वादग्रस्त आणि गाजणारी ठरणार आहे. अमेरिकेत आज खूप मोठी घडामोड घडली आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेची आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे देशात आणि देशाबाहेर मोठ्या हालचाली सुरु आहेत. ट्रम्प यांनी संघराज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याअंतर्गत, त्यांनी कर्मचाऱ्यांना बायआऊट पॅकेज ऑफर केले होते. ते एकाचवेळी ४० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वीकारले आहे.
ट्रम्प यांच्या या बायआऊट पॅकेजचा स्वीकार करत ४० हजार कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना एकतर हे पॅकेज स्वीकारा किंवा स्वत:हून नोकरीचा राजीनामा द्या, असा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी ६ फेब्रुवारीपर्यंतची वेळ दिली होती. सरकारी आकड्यांनुसार अमेरिकेत संघराज्य कर्मचाऱ्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे.
नोकरीवरून राजीनामा दिल्याच्या बदल्यात, संघीय कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचा पगार आणि निश्चित भत्ता दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांची ही संख्या ट्रम्पनी निर्धारित केलेल्या आकड्यापेक्षा कमी आहे. यामुळे आता पुढे आणखी किती दबाव टाकला जातो, यावर सारे अवलंबून असणार आहे. अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षा एव्हरेट केली यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. संघीय कर्मचारी ट्रम्प यांच्या अजेंड्यात बसत नाहीत. त्यांच्यावर नोकरी सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप त्यांनी केला होता.