बऱ्याचदा प्रेमसंबंधांमध्ये विश्वासघात जवळच्यांकडूनच झाला तर त्यामुळे होणारा त्रास आणि वेदना ह्या अधिक असतात. चीनमधून समोर आलेल्या अशाच एका घटनेमधून नात्यांमध्ये स्वार्थ कुठल्या पातळीला जाऊ शकतो हे दिसून येत आहे. बँक ऑफ चायनाचे माजी चेअरमन लियू लियांगे यांनी त्यांच्या मुलाचं ब्रेकअप करवून त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत विवाह केल्याचं समोर आलं आहे. सदर मुलगी ही आपल्या कुटुंबात येण्याच्या योग्यतेची नाही, असं सांगत लियांगे यांनी त्यांच्या मुलाचं एका मुलीसोबत असलेलं नातं, तोडलं. त्यानंतर काही महिन्यांनी त्याच मुलीसोबत विवाह केला.
याबाबतच्या अधिक माहितीनुसार ६३ वर्षीय लियू लियांगे यांनी आपलं चौथं लग्न त्यांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडसोबत केलं. तत्पूर्वी लियू यांनी त्यांच्या मुलाला ‘तू जा मुलीच्या प्रेमात पडला आहेस, ती मुलगी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीसाठी योग्य नाही आहे, असे सांगितले. मुलानेही वडिलांचं म्हणणं खरं मानलं आणि आपल्या गर्लफ्रेंडसोबत असलेलं नातं तोडलं. मात्र सहा महिन्यांनी लियू यांनी त्याच मुलीसोबत लग्न केलं. ही बाब समजल्यावर सदर तरुणाला चांगलाच धक्का बसला. तसेच तो तणावग्रस्त झाला.
चिनी उद्योजक लियू लियांगे यांनी केवळ नात्यांमध्येच नाही तर व्यावसायिक जीवनामध्येही वादामध्ये राहिलेले आहेत. नोव्हेंबर महिन्यात त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर १२१ दशलक्ष युआन (सुमारे १४१ कोटी रुपये) एवढी लाच घेतल्याचा आणि सुमारे ३.३२ बिलियन युआन (सुमारे ३ हजार ७३५ कोटी रुपये) एवढं कर्ज अवैधरीत्या वाटप केल्याचा आरोप होता. मात्र गुन्हा कबुल केल्याने आणि संपत्ती जप्त करण्यात आल्याने ही शिक्षा दोन वर्षांसाठी टाळण्यात आली आहे.
लियूच्या जीवनामधील आणखीही काही वाद समोर आले आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार लियू यांना सुरुवातीचं यश हे त्यांच्या पहिल्या पत्नीच्या प्रभावामधून मिळालं होतं. ती एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मुलगी होती. मात्र लियू याने कारकिर्दीत ठराविक उंची गाठल्यावर तिला सोडलं आणि कमी वयाच्या मुलींसोबत लग्न करण्यास सुरुवात केली. त्याने चौथं लग्न तर मुलाच्या गर्लंफ्रेंडसोबत केलं. त्यामुले त्याच्यावर टीका होत आहे.