थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:30 IST2025-07-25T09:47:33+5:302025-07-25T10:30:07+5:30
थायलंड-कंबोडिया सीमेवर झालेल्या लष्करी चकमकींमुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या चकमकीत १५ जण ठार आणि ४६ जण जखमी झाले आहेत.

थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर कालपासून तणाव वाढला असून काल झालेल्या भीषण लष्करी चकमकींमुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत. या तणावामध्ये चकमकींमध्ये १४ नागरिक आणि एका सैनिकासह १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ जण जखमी झाले आहेत.
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
कंबोडियाने अजूनही नुकसानीची नोंद केलेली नाही. बुधवारी भूसुरुंग स्फोटाने हिंसाचार सुरू झाला, यामध्ये पाच थाई सैनिक जखमी झाले. या घटनेने दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला.
थायलंडचे आरोग्यमंत्री सोमसाक यांनी कंबोडियावर नागरिकांवर आणि रुग्णालयावर हल्ला केल्याचा आरोप केला. "आम्ही कंबोडियन सरकारला हे ताबडतोब थांबवून शांततेच्या मार्गावर परत येण्याचे आवाहन करतो",असंही ते म्हणाले.
UN मध्ये बैठक होणार
थायलंड आणि कंबोडियामधील गेल्या दशकातील सर्वात रक्तरंजित सीमा संघर्षात १००,००० हून अधिक लोक सीमावर्ती भागातून पळून गेले आहेत.
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांच्या विनंतीनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद शुक्रवारी दोन्ही देशांमधील सीमेवरील संघर्षांवर चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक घेणार आहेत. तर अमेरिकेनेही हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन केले आहे.