मस्क यांच्या ट्रान्सजेंडर मुलीला मिळाली नाव बदलण्याची परवानगी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 03:42 PM2022-06-25T15:42:10+5:302022-06-25T15:43:11+5:30

विवियनची आई जस्टिन विल्सन कॅनडियन लेखिका आहे. जस्टिन विल्सन आणि इलॉन मस्क यांनी 2000 मध्ये लग्न केले होते. यानंतर, 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

Tesla elon musks transgender daughter granted name change to cut ties with father  | मस्क यांच्या ट्रान्सजेंडर मुलीला मिळाली नाव बदलण्याची परवानगी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मस्क यांच्या ट्रान्सजेंडर मुलीला मिळाली नाव बदलण्याची परवानगी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Next

प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या ट्रान्सजेंडर मुलीला न्यायालयाने नाव बदलण्याची परवानगी दिली आहे. 18 वर्षीय जेव्हियरने लिंग बदलल्यानंतर, नाव बदलून व्हिव्हियन जेना विल्सन ठेवले आहे. आता तिला कायदेशीर कागदपत्रांवरही तिचे नाव बदलायचे आहे, यासाठी तिने नाव बदलून नवे बर्थ सर्टिफिकेट मिळावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिची मागणी मान्य करत न्यायालयाने नाव बदलण्यास परवानगी दिली आहे. तसेच, लवकरच झेवियरला नवीन जन्म प्रमाणपत्र दिले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

वडिलांसोबत संबंध ठेवण्याची इच्छा नाही -
झेव्हियरने आपल्या याचिकेत म्हटले आहे, की तिने तिच्या बायोलॉजिकल वडिलांसोबतचे सर्व संबंध संपवण्यासंदर्भातही भाष्य केले होते. ती म्हणाली होती, 'मला माझ्या बायोलॉजिकल वडिलांसोबत राहण्याची इच्छा नाही अथवा त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचे नाते ठेवण्याचीही इच्छा नाही.' तिने आपल्या नावासोबत आईचे नाव जोडले आहे.

विवियनची आई जस्टिन विल्सन कॅनडियन लेखिका आहे. जस्टिन विल्सन आणि इलॉन मस्क यांनी 2000 मध्ये लग्न केले होते. यानंतर, 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. मात्र, अद्याप यासंदर्भात इलॉन मस्ककडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इलॉन मस्क यांना 8 मुले आहेत.
 

Web Title: Tesla elon musks transgender daughter granted name change to cut ties with father 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.