शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

Video: भररस्त्यात दहशतवाद्याचा खात्मा, इस्रायल सैन्यानं केली नागरिकांची सुटका; व्हिडिओ जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 12:10 IST

इस्रायल डिफेन्स फोर्सच्या शालदाग युनिटमधील लढवय्या सैनिकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, भारताने दहशतवादी कृत्याविरुद्ध निषेध करता इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, पॅलेस्टाईन नागरिकांच्या मदतीसाठी गरजेच्या वस्तूही पाठवल्या आहेत. गाझा पट्टीवर इस्रायलचं सैन्य आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये जमिनीवर उतरुन ही युद्ध सुरू आहे. त्याचाच एक भाग असलेला व्हिडिओ इस्रायल सैन्य दलाकडून शेअर करण्यात आला आहे. 

इस्रायल डिफेन्स फोर्सच्या शालदाग युनिटमधील लढवय्या सैनिकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, IDF सैनिकांचे कधीही न पाहिलेले हे फुटेज असून दहशतवाद्याच्या पाठिमागे पळून ते खात्मा करताना दिसत आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आणि किबुत्झ बेरीच्या नागरिकांची सुटका करण्यासाठी IDF फोर्स सदैव तत्पर असल्याचं IDF ने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. इस्रायलच्या सैन्य जवानांचं शौर्य या व्हिडिओतून दिसत आहे.  या व्हिडिओ फुटेजमध्ये, IDF सैनिक दहशतवाद्यांच्या वाहनावर गोळीबार करताना दिसून येतात. त्यामुळे, वाहनावरील नियंत्रण गमावल्यानंतर तो कारमधून बाहेर येतो. मात्र, शालदाड युनिटचं सैन्य गाडीजवळ जाऊन त्या चालकाला गोळ्या घालून त्याचा खात्मा करतात. त्यानंतर, युनिटच्या सैनिकांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेलमधील इतर दहशतवाद्यांनाही ठार मारले आहे. दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, IDF च्या विशेष दलांमुळे किबुत्झ बेरीतील रहिवाशी नागरिकांची सुटका झाल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. ज्यामध्ये, आपल्या लहान मुलांसह, पाळीव प्राण्यांना घेऊन जाताना ते दिसून येतात. 

इस्रायलची भारताकडे मागणी

इस्रायलने भारताकडे हमाल संघटनेला दहशवादी म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना इस्रायलच्या राजदूत नाओर गिलोन यांनी हमासविरुद्धच्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे आभारही व्यक्त केले. तसेच, इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर संबंधित भारतीय अधिकाऱ्यांना हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याची विनंती केली आहे. यासोबतच हा मुद्दा यापूर्वीही उपस्थित करण्यात आल्याचे नाओर गिलोन यांनी सांगितले. 

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्धterroristदहशतवादीSocial Mediaसोशल मीडिया