शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला; महिलेचा गळा चिरला, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 4:05 PM

Terrorist Attack on France: चाकू हल्ला करण्यामागे नेमके कारण समजू शकलेले नाही. सध्या तेथे पैंगबर कार्टून वाद सुरु आहे. या हल्लामागे हा वाद असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पॅरिस : पैगंबरांच्या कार्टून वादाने आता हिंसक वळण घेतले असून फ्रान्समध्ये शिक्षकाचा गळा चिरून हत्येनंतर आणखी एक अशाचप्रकारच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. फ्रान्सच्या एका चर्चमध्ये हल्लेखोराने एका महिलेचा गळा चाकूने कापला. तसेच अन्य दोन लोकांवर चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना फ्रान्सच्या नाईस शहरात झाली आहे. शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले. 

महापौर क्रिस्चियन इस्‍तोर्सी यांनी सांगितले की, चाकूहल्ला झालेली ही घटना शहरातील नोट्रे डॅम चर्चमध्ये झाली आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तसेच तीन लोकांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. अन्य काही लोक जखमी झाले आहेत. महिलेचा गळा कापण्यात आल्याचे फ्रान्सच्या एका नेत्यानेही सांगितले आहे. 

फ्रान्सच्या दहशतवाद विरोधी पथकाने सांगितले की, या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. घटनास्थळी सशस्त्र जवानांनी चर्चला घेराव घातला आहे. अँम्बुलन्स आणि फायर सर्व्हिसच्या गाड्या घटनास्थळी आल्या आहेत. हा हल्ला जेव्हा झाला त्या आधी काही वेळ एका शिक्षिकेची गळा चिरून हत्या करण्यात आली. 

चाकू हल्ला करण्यामागे नेमके कारण समजू शकलेले नाही. सध्या तेथे पैंगबर कार्टून वाद सुरु आहे. या हल्लामागे हा वाद असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दिशेने तपास सुरु करण्यात आला आहे. शिक्षिकेच्या हत्येनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमैनुअल मॅक्रो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्माचा उपहास करण्याच्या अधिकाराचे जोरदार समर्थन केले होते. यानंतर ते मुस्लिम देशांच्या टीकेचे धनी झाले होते. 

 

राजदूत मागे बोलावण्यावरून पाकिस्तानचे हसे

पाकिस्तानने आज पुन्हा एकदा जगभरात आपले हसे करून घेतले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी इस्लामिक दहशतवादावर एक वक्तव्य केले होते. यावरून मुस्लिम राष्ट्रांनी निषेध व्यक्त केला. पाकिस्ताननेही संसदेत निषेध प्रस्ताव मांडला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी आणखी एक प्रस्तावा देत म्हटले की, फ्रान्समधील पाकिस्तानी राजदूताला माघारी का बोलवू नये. 

धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या संसदेत या प्रस्तावावर बहुमताने संमती देण्यात आली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफसह विरोधी पक्षांना एकमुखाने प्रस्तावाला होकार दिला. इथेच त्यांची फजिती झाली. गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानचा फ्रान्समध्ये कोणीही राजदूत नेमलेला नाही. यावरून परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना त्यांच्या मंत्रालयाचे किती ज्ञान आहे हे दिसून आले. 

टॅग्स :Franceफ्रान्सTerror Attackदहशतवादी हल्ला