अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अमेरिकेवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला
By Admin | Updated: November 5, 2016 00:04 IST2016-11-05T00:04:51+5:302016-11-05T00:04:51+5:30
अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अमेरिकेवर हल्ला करण्याची योजना अल कायदाने आखली आहे.

अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अमेरिकेवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला
> ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 4 - अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अमेरिकेवर हल्ला करण्याची योजना अल कायदाने आखली आहे. अल कायदाचे दहशतवादी सोमवारी हल्ला करू शकतात, असा इशारा अमेरिकन गुप्तहेर खात्याने न्यूयॉर्क, टेक्सास आणि व्हर्जिनियामधील प्रशासनाला दिला आहे.
सीबीएस न्यूज या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. मात्र सीबीएसच्या वृत्तामध्ये हल्ला कुठे होऊ शकतो याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अमेरिकन गुप्तहेर संघटनेच्या अधिकाऱ्यांनी हल्ल्याची शक्यता गृहित घरून दहशतवाद्याविरोधातीत टास्क फोर्सना अलर्ट दिला आहे.
दरम्यान, एफबीआय अमेरिकेतील फेडरल, राज्य आणि स्थानिक पातळीवरील सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून कोणत्याही प्रकारच्या धोक्याची ओळख पटवण्याच्या तयारीत आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताबाबत मौन पाळले आहे. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीला प्रभावित करण्यासाठी रशिया तसेच इतर देशांकडून खोट्या बातम्या प्रसारित होण्याची तसेच कॉम्प्युटर हॅकिंगसारख्या घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा आपली तयारी अधिक सक्षम करत आहेत.