म्युझिकल कॉन्सर्टवर दहशतवादी हल्ला, 19 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: May 23, 2017 07:16 IST2017-05-23T06:28:18+5:302017-05-23T07:16:18+5:30
इंग्लडमधील मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधीक जण जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

म्युझिकल कॉन्सर्टवर दहशतवादी हल्ला, 19 जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - इंग्लडमधील मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधीक जण जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या घटनास्थळावर अनेक रुग्णवाहिका आल्या असून जखमींना सुरक्षित रुग्णालयात नेण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे समजते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सर्व परिसरात तपासणी सुरु केली असून जागोजागी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अमेरिकन गायिका अरियाना ग्रँण्डचा म्युझिकल कॉन्सर्ट होणार होता. या कार्यक्रमाला 21 हजार प्रेक्षक येण्याची शक्यता होती. माध्यमांच्या वृत्तानुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. कार्यक्रम स्थळापासून जवळच राहणाऱ्या सूजी मिशेलने सांगितले की, कार्यक्रमाच्या समोरच्या बाजूला मी राहते. भीषण स्फोटाच्या आवाजानंतर मी बाहेर आले. मोठ्य़ा संखेने रस्त्यावर लोक इकडे-तिकडे धावत होते.
म्युझिकल कॉन्सर्टमध्ये भाग घेतलेल्या एकाने स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, स्फोटानंतर सर्वजण मोठ-मोठ्याने ओरडत धावत होते. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. स्फोटाचा परिसर धूराने व्यपला होता आणि विचित्र असा जळण्याचा वास येत होता. बॉम्बस्फोटानंतर मँचेस्टर विक्टोरिया स्टेशन वरुन जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.