शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान हादरले! दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनमध्ये घुसून गोळीबार, १० पोलीस कर्मचारी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:59 IST

निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या हल्ल्यात ६ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

Pakistan, Attack on Police: पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान पाकिस्तानात अनेक ठिकाणी हिंसाचार आणि दहशतवादी घटना सातत्याने घडत आहेत. बलुचिस्तानमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटाच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच, पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खान शहरातील पोलीस स्टेशनला लक्ष्य करून मोठा हल्ला केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिसुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात दहा पोलीस ठार झाले, तर ६ जण जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ल्यात १० पोलीस शहीद

अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी पहाटे दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली. या दरम्यान अज्ञात दहशतवाद्यांनी प्रथम स्नायपर गोळीबार केला आणि नंतर चौधवन पोलीस ठाण्यात प्रवेश केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आणि हातबॉम्बही फेकले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये स्वाबीच्या एलिट पोलिस युनिटच्या सहा पोलिसांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे, जे निवडणुकीदरम्यान स्थानिक पोलिसांना मदत करण्यासाठी परिसरात तैनात होते.

रस्त्यांवर शोधमोहीम सुरू

या हल्ल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्हा आणि डेरा गाझी खानकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात असून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

बलुचिस्तानच्या नुष्की जिल्ह्यातही झाला स्फोट

रविवारी, ४ फेब्रुवारी रोजी बलुचिस्तानच्या नुष्की जिल्ह्यात पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या (ECP) कार्यालयाबाहेर एक बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, ECP कार्यालयाच्या गेटबाहेर झालेल्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीPoliceपोलिसDeathमृत्यू