काबूलमध्ये अमेरिकन विद्यापीठावर दहशतवादी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 22:30 IST2016-08-24T22:20:12+5:302016-08-24T22:30:03+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या अमेरिकन विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.

काबूलमध्ये अमेरिकन विद्यापीठावर दहशतवादी हल्ला
>ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. २४ - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या अमेरिकन विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.
येथील प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन विद्यापीठावर कॅम्पसमध्ये स्थानिक वेळेनुसार पावणे आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा आवाज आला. यावेळी कॅम्पसमध्ये विद्यार्थी जेवण करण्यासाठी एकत्र जमले होते. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी स्फोटकांचा मारा आणि गोळीबार केल्याचा आवाज ऐकू आला. तसेच, या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू आणि पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून यामुळे कॅम्पस परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, घटनास्थळी सुरक्षा दलाचे जवान, अॅम्बुलन्स आणि रेस्क्यु टीम दाखल झाली असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. तसेच, या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.