अमेरिकेच्या टायफॉन लाँचर्सची दहशत; चीननं बाह्या सरसावल्या, उचललं उचललं मोठं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:47 IST2025-02-23T15:46:21+5:302025-02-23T15:47:03+5:30
फेब्रुवारी २०२५ मध्ये पब्लिश झालेल्या या हवालात म्हणण्यात आले आहे की, अशा प्रकारची पाणबुडी तयार करण्याचा उद्देश, प्रदेशात वाढणाऱ्या परदेशी उपस्थितीचा सामना करणे आणि नौदलाची क्षमता वाढविणे, असा आहे. महत्वाचे म्हणजे, फिलीपिन्सच्या लुझोन बेटावर अमेरिकेने तैनात केलेल्या टायफॉन लाँचर्सचा विचार करता, हा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिकेच्या टायफॉन लाँचर्सची दहशत; चीननं बाह्या सरसावल्या, उचललं उचललं मोठं पाऊल
चीनच्या वुहान प्रांतात एक विशेष पाणबुडी तयार करण्यात येत आहे. एका निमशासकीय लष्करी मासिकाने यासंदर्भात माहिती दिली आहे. या मासिकानुसार, या पाणबुडीचा वापर फिलीपीन्समध्ये तैनात एका मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र, पीपल्स लिबरेशन आर्मीकडून यासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत पुष्टी करण्यता आलेली नाही.
अमेरिकेच्या टायफॉन लाँचर्सचा सामना करण्यासाठी घेण्यात आला निर्णय -
'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, चीन स्टेट शिपबिल्डिंग कॉरपोरेशनची मालकी असलेल्या नेवल अँड मर्चंन्ट शिप्सच्या अहवालात या पाणबुडीचे डिझाइन, तिची क्षमता आणि तिचे अस्तित्व यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये पब्लिश झालेल्या या हवालात म्हणण्यात आले आहे की, अशा प्रकारची पाणबुडी तयार करण्याचा उद्देश, प्रदेशात वाढणाऱ्या परदेशी उपस्थितीचा सामना करणे आणि नौदलाची क्षमता वाढविणे, असा आहे. महत्वाचे म्हणजे, फिलीपिन्सच्या लुझोन बेटावर अमेरिकेने तैनात केलेल्या टायफॉन लाँचर्सचा विचार करता, हा निर्णय घेण्यात आला आहे. टाइफॉन लाँचर्स लुझोन बेटावरून थेट रशिया, चीन, आणि नॉर्थ कोरियावरही स्ट्राइक करू शकते.
हिच्या सहाय्याने PLA शत्रूवर गुप्तपणेही हल्ला करू शकते -
अहवालानुसार, ही पाणबुडी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हिच्या सहाय्याने PLA आपल्या शत्रूवर गुप्तपणे हल्ला करू शकते. तसेच आवश्यकता भासल्यास या हिच्यावर अण्वस्त्रे देखील तैनात केजी जाऊ शकतात. याशिवाय, ही पाणबुडी इतर सैन्य दलांसह समन्वय साधून शत्रू देशांकडून होणाऱ्या हल्ल्यांपासूनही वाचवू शकते. तसेच, एकट्या अथवा छोट्या-छोट्या समूहांमध्ये तैनात असलेल्या शत्रूलाही सळो की पळो करू शकते.
अशी आहे खासियत -
या पाणबुडीत विविध प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यात क्षेपणास्त्रांसाठी व्हर्टिकल लाँच सिस्टम (VLS), क्रूझ, अँटी-शिप बॅलिस्टिक व्हेरिअंट्स आणि सुरक्षिततेसाठी X आकाराचे टेल फिन आहे. तसेच, युद्धादरम्यान, ही पाणबुडी मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते.