पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलिस जखमी
By Admin | Updated: November 15, 2015 14:27 IST2015-11-15T14:14:23+5:302015-11-15T14:27:50+5:30
पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही इसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला असून या हल्ल्यात चार पोलिस जखमी झाले आहे.

पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलिस जखमी
ऑनलाइन लोकमत
अंकारा, दि. १५ - पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही इसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला असून या हल्ल्यात चार पोलिस जखमी झाले आहे. तुर्कीमध्ये आजपासून जी - २० परिषद सुरु होत असून या परिषदेसाठी बराक ओबामा, नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील प्रमुख नेते सध्या तुर्कीत आहे.
तुर्कीत आजपासून जी २० परिषद होत असून इसिसने जी २० देशांना पुन्हा एकदा आव्हानच दिले आहे. इसिसच्या दहशतवाद्याने दक्षिण तुर्कीत आत्मघातकी हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे. हल्ल्यानंतर जी -२० परिषदेसाठी तुर्कीत आलेल्या जगभरातील नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.