शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खामेनेईंच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेत प्रचंड तणाव; कोणकोणत्या देशांवर इराणने हल्ला केला? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 14:26 IST

Iran Conflict: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केल्यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

Iran Conflict: अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर मोठ्या प्रमाणावर संयुक्त लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेने या मोहिमेला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’, तर इस्रायलने ‘लायन्स रोर’ असे नाव दिल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई ठार झाले असून, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसह अनेक वरिष्ठ लष्करी कमांडरही मारले गेल्याचे वृत्त आहे.

इराणने 9 देशांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले

या घडामोडींनंतर मध्य-पूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली असून, इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाई करत या प्रदेशातील अमेरिकन व सहयोगी देशांतील लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणने बॅलिस्टिक मिसाइल्स, क्रूझ मिसाइल्स आणि सुसाइड ड्रोन वापरून मध्य-पूर्वेतील अनेक देशांवर हल्ले केले. मध्य-पूर्वेत एकूण 17 देश असून, त्यापैकी 9 देशांवर इराणने हल्ले केल्याचा दावा आहे.

इस्रायल

इराणने तेल अवीव, जेरुसलेमसह प्रमुख शहरांतील लष्करी तळ व एअरबेस लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. नेवातिम, हत्झेरिम आणि रामत डेविड हे एअरबेस निशाण्यावर होते. इस्रायली लष्करानुसार, आयरन डोम आणि एरो डिफेन्स सिस्टिमने बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच पाडली.

सौदी अरेबिया

इराणने राजधानी रियाध, पूर्व प्रांत तसेच जाझान व खमीस मुशायत परिसरातील किंग फहद एअरबेस लक्ष्य केल्याचे सौदी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

कतार

इराणने 65 क्षेपणास्त्रे आणि 12 ड्रोन डागण्यात आल्याची कतारने पुष्टी केली. याशिवाय, अल उदैद येथील अमेरिकी लष्करी तळांवरही हल्ले करण्यात आले.

बहरीन

राजधानी मनामामधील अमेरिकी नौदलाच्या 5व्या फ्लीटचे मुख्यालयावर इराणनने हल्ला केला. याशिवाय क्राउन प्लाझा हॉटेलवर ड्रोन कोसळल्याची माहिती आहे.

कुवैत

अली अल-सालेम एअरबेसवर बॅलिस्टिक मिसाइल हल्ले झाले, मात्र हवाई संरक्षण प्रणालीने ते निष्प्रभ केले. कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ल्यात काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले.

संयुक्त अरब अमिराती (UAE)

अबू धाबीमध्ये अनेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आली; किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुबईतील बुर्ज अल अरब, द पाम परिसर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्ष्य झाल्याचा दावा आहे. इराणने UAE वर 209 ड्रोन आणि 137 क्षेपणास्त्रे डागल्याचे रिपोर्ट्स सांगतात.

जॉर्डन

जॉर्डनने आपल्या हवाई हद्दीत घुसलेल्या दोन क्षेपणास्त्रांना पाडल्याचा दावा केला आहे.

इराक

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इरबिल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील अमेरिकी ठिकाणांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे.

ओमान

इराणने ओमानवरही हल्ला केल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

परिणाम आणि जागतिक चिंता

तज्ज्ञांच्या मते, हा संघर्ष प्रादेशिक युद्धात रूपांतरित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम जागतिक तेल पुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग आणि कूटनीतिक संबंध यांवर गंभीरपणे होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Conflict: Iran attacks nine Middle Eastern countries amidst tensions.

Web Summary : Amidst US-Israel joint military action, Iran retaliated, attacking nine Middle Eastern nations with missiles and drones, targeting military and strategic sites. This escalates regional conflict fears.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलwarयुद्धAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई