शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

अबब ! टेनिसबॉलच्या आकाराएवढा हिरा, 347 कोटी रुपयांना केली खरेदी

By पवन देशपांडे | Published: September 27, 2017 11:53 PM

एखादा हिरा टेनिस बॉलच्या आकाराएवढा असल्यास? खरं वाटणार नाही, पण जवळपास एवढ्याच आकाराच्या एका हि-याची नुकतीच विक्री झाली आहे.

सोथबी (कॅनडा), दि. 28 - एक छोटा हिरा खरेदी करायचा म्हटले तरी सर्वसामान्यांची सर्व बचत खर्ची लागू शकते. त्यामुळे डायमंड रिंगमध्ये असलेल्या छोट्या हि-यांचं आपल्यासाठी मोल अनमोल आहे. परंतु, एखादा हिरा टेनिस बॉलच्या आकाराएवढा असल्यास? खरं वाटणार नाही, पण जवळपास एवढ्याच आकाराच्या एका हि-याची नुकतीच विक्री झाली आहे. तब्बल साडेतीनशे कोटी रुपये रुपयांना एका हिरे व्यापा-यानं या हि-याची खरेदी केली आहे.

जगातील दुस-या क्रमांकाचा सर्वांत मोठा हिरा म्हणून त्याला ओळख मिळाली आहे. आकाराने तो जवळपास टेनिस बॉल एवढा आहे. ब्रिटनमधील लॉरेन्स ग्राफ या हिरे व्यापा-याने हा 1109 कॅरेटचा हिरा तब्बल 347 कोटी रुपये देऊन लिलावात विकत घेतला आहे.एवढा मोठा हिरा होता कोणाकडे?- कॅनडाच्या लुकारा डायमण्ड्स कॉर्पोरेशन या कंपनीकडे हा हिरा होता. सध्या तो पैलू न पाडलेल्या स्थितीत आहे.- एवढा मोठा हिरा घेणार कोण, अशी भीती होती, लुकारा डायमण्ड्स कंपनीचे सीईओ आणि प्रेसिडेंट विल्यम लॅम्ब यांना होती.- यापूर्वी एकदा या हि-याचा लिलावही आयोजित करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. मात्र त्यासाठी कोणी खरेदीदार मिळाला नव्हता.- अखेर लॉरेन्स ग्राफ या ब्रिटीश हिरे व्यापाºयाने यासाठी सर्वांत मोठी बोली लावली.- एवढा मोठा हिरा खरेदी करण्याची क्षमता फार कमी व्यापा-यांकडे आहे आणि त्यातही त्याला पैलू पाडण्याचे कसब खूपच थोडक्या लोकांना आहे.- सोथबी येथे झालेल्या लिलावात अखेर ग्राफ यांनी तो खरेदी केला.

एवढ्या मौल्यवान खडा कुठे सापडला?दक्षिण अफ्रिकेतील बोत्सवाना देशात हा हिरा दोन वर्षांपूर्वी 2015 साली नोव्हेंबर महिन्यात सापडला होता. त्याला ‘गिफ्ट आॅफ मदर अर्थ’ असेही म्हटले गेले. बोत्सवाना देशातील त्स्वाना या भाषेत त्याचं नाव ठेवलं ‘लासेडी ला रोना’; म्हणजे ‘आमचा प्रकाश’.सर्वांत मोठा हिरा कोणता?जगातील सर्वांत मोठा हिरा 1905 साली दक्षिण अफ्रिकेत सापडला होता. त्याचं नाव ठेवलं गेल कुलिनन डायमंड. तो होता तब्बल 3016.5 कॅरेटचा. त्याला पैलू पाडून त्याचे नऊ वेगवेगळ्या आकाराचे हिरे नंतर बनवण्यात आले होते. त्यातलाच एक मोठा हिरा ब्रिटीशांच्या क्राउल ज्वेल्समध्ये आहे. तसेच त्याचा एक मोठा हिरा ‘ग्रेट स्टार आॅफ अफ्रिका’ म्हणूनही ओळखला जातो. तो तब्बल 530.20 कॅरेटचा आहे.