तापमान वाढ असह्य; २०१९ दुसरे सर्वाधिक ‘उष्ण’ वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 03:06 AM2019-11-21T03:06:24+5:302019-11-21T06:30:19+5:30

ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषण कारणीभूत

Temperature rise unbearable; ९ ९ Second most 'hot' year | तापमान वाढ असह्य; २०१९ दुसरे सर्वाधिक ‘उष्ण’ वर्ष

तापमान वाढ असह्य; २०१९ दुसरे सर्वाधिक ‘उष्ण’ वर्ष

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भर पडत आहे. १९९८ पासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याची नोंद नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनने केली. १९९८सह २००५, २००९, २०१०, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८ या वर्षांची उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली.

नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनकडील माहितीनुसार, अल निनोसह तत्सम घटकांमुळे तापमानात उत्तरोत्तर वाढ होत आहे. मुळात जमिनीसह समुद्रावरील वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणात पडणारी भर; असे अनेक घटक वाढत्या उष्ण वर्षांस कारणीभूत आहेत. नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशननेही २०१९ सालच्या सात महिन्यांतील तापमानाची नोंद घेत, त्याची १८८० सालापासून आतापर्यंत म्हणजे १४० वर्षांतील माहितीसोबत तुलना केली. त्यावेळी तापमानवाढीतील फरक समोर आला.
जुलैमध्ये युरोपसह ग्रीनलँड उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला. जुलैमध्ये अलास्का, पश्चिम कॅनडा, मध्य रशिया येथील तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ३ अंशांनी अधिक होते. जानेवारी ते जुलै, २०१९ हा काळ तिसरा उष्ण काळ ठरला. दरम्यान, जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाता कामा नये, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

जागतिक पातळीवरील गेल्या शंभर वर्षांतील उष्ण वर्षे (अंश सेल्सिअसमध्ये)
वर्षे       तापमानवाढ
२०१५       ०.५९
२०१७       ०.७१
२०१०        ०.८२
२००९       ०.८५
२०१६       ०.८७

जुलै महिना सर्वांत उष्ण
जुलै २०१९ महिन्यात जगभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे २०१९ मध्ये जुलै महिना पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण महिना ठरला.
१९ जुलै, २०१९ रोजी सांताक्रुझ वेधशाळेत कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सर्वसाधारण कमाल तापमानाच्या तुलनेत ते ६ अंशाने अधिक होते. जुलैमधील महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमाल तापमान होते. २२ जुलै, १९६० रोजी ३४.८ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली होती.

Web Title: Temperature rise unbearable; ९ ९ Second most 'hot' year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.