‘कुमारवयीन’ खुन्याला फाशी
By Admin | Updated: August 4, 2015 23:28 IST2015-08-04T23:28:18+5:302015-08-04T23:28:18+5:30
मानवाधिकार संघटनांच्या विरोधामुळे चारदा डेथ वॉरंट मागे घेतल्यानंतर पाकिस्तानने अखेर मंगळवारी कुमारवयीन खुन्याला फाशी दिली

‘कुमारवयीन’ खुन्याला फाशी
इस्लामाबाद : मानवाधिकार संघटनांच्या विरोधामुळे चारदा डेथ वॉरंट मागे घेतल्यानंतर पाकिस्तानने अखेर मंगळवारी कुमारवयीन खुन्याला फाशी दिली.
शफाकत हुसैन याला मंगळवारी पहाटे कराची येथील मध्यवर्ती तुरुंगात फाशी देण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरचा रहिवासी असलेल्या हुसैनला कराचीत सात वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी २००४ मध्ये दोषी ठरविण्यात आले होते. गुन्हा घडला तेव्हा तो अल्पवयीन होता, असे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे होते. मात्र चौकशीत गुन्ह्याच्यावेळी त्याचे वय २३ असल्याचे आढळले होते. (वृत्तसंस्था)