टेलर स्विफ्टला ‘ग्रॅमी’

By Admin | Updated: February 17, 2016 02:57 IST2016-02-17T02:57:04+5:302016-02-17T02:57:04+5:30

पॉप गायिका टेलर स्विफ्ट यांना अल्बम आॅफ द ईअरचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, तर गायनाच्या श्रेणीत केंड्रिक लॅमर यांनी पुरस्कार मिळविला आहे.

Taylor Swift's 'Grammy' | टेलर स्विफ्टला ‘ग्रॅमी’

टेलर स्विफ्टला ‘ग्रॅमी’

लॉस एंजिलिस : पॉप गायिका टेलर स्विफ्ट यांना अल्बम आॅफ द ईअरचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, तर गायनाच्या श्रेणीत केंड्रिक लॅमर यांनी पुरस्कार मिळविला आहे.
दोन अन्य महत्त्वाच्या पुरस्कारांत सर्वश्रेष्ठ गीत आणि रेकॉर्ड हे अनुक्रमे थिंकिंग आऊट लाऊड (एड शीरन) आणि अपटाऊन फंक (ब्रूनो मार्स, मार्क रॉनसन) यांना मिळाले. लॅमरला ११ श्रेणीत नामांकन मिळाले होते; पण सर्वश्रेष्ठ अल्बम टू पिम्प अ बटरफ्लायच्या पुरस्काराशिवाय अन्य श्रेणीत पुरस्कार मिळविण्यात ते अपयशी ठरले. याशिवाय त्यांना म्युझिक व्हिडिओ व अन्य श्रेणीत सहविजेत्यांचा पुरस्कार मिळाला.
आसिफ कपाडियांचा सन्मान
सितारवादक अनुष्का शंकर या सोहळ्यात पुरस्कार मिळविण्यात अपयशी ठरल्या, तर भारतीय ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडिया आपली डॉक्युमेंट्री ‘एमी’साठी सर्वश्रेष्ठ संगीत चित्रपटाच्या श्रेणीत विजयी ठरले. अनुष्का यांना त्यांच्या होम या अल्बमसाठी नामांकन मिळाले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Taylor Swift's 'Grammy'