ढाका: शेजारील राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता लोकशाही प्रक्रियेने सत्तापालट दाखविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. 'बांग्लादेश नॅशनल पार्टी'चे नेते तारिक रहमान १७ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी बांग्लादेशने जगभरातील १३ देशांच्या प्रतिनिधींना आणि सुमारे १२०० स्थानिक व परदेशी पाहुण्यांना निमंत्रण दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढाका येथील बंगभवन किंवा ऐतिहासिक मैदानावर हा सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी भारत, अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, तुर्की आणि कतार यांसारख्या प्रमुख १३ देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून नव्या सरकारला पाठिंबा मिळावा, या उद्देशाने हे निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. याचबरोबर १२०० स्थानिक व परदेशी पाहुणे देखील असणार आहेत.
कोण आहेत तारिक रहमान?तारिक रहमान हे बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. प्रदीर्घ काळ लंडनमध्ये निर्वासित जीवन जगत होते. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर ते पुन्हा सक्रिय राजकारणात परतले आहेत. त्यांच्या शपथविधीने बांग्लादेशातील प्रदीर्घ काळ चाललेल्या राजकीय अस्थिरतेवर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.
सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्तया सोहळ्यासाठी १२०० हून अधिक पाहुणे उपस्थित राहणार असल्याने ढाका शहरात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नव्या सरकारच्या स्थापनेकडे दक्षिण आशियातील सर्वच देशांचे लक्ष लागले आहे, कारण भारतासोबतचे संबंध आगामी काळात कसे असतील, याबाबत चर्चिले जात आहे.
भारताकडून कोण?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, मंगळवारी मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक आहे आणि दिल्लीत 'एआय समिट'चे आयोजन करण्यात आले आहे. या पूर्वनियोजित व्यस्त कार्यक्रमांमुळे पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि इतर वरिष्ठ अधिकारीही ढाका येथे जाण्याची शक्यता आहे.
Web Summary : Bangladesh's new PM, Tarique Rahman, will be sworn in on February 17, 2026. Thirteen countries, including India, have been invited to the ceremony. India's PM Modi is unable to attend due to prior commitments; Lok Sabha Speaker Om Birla may represent India.
Web Summary : बांग्लादेश के नए पीएम, तारिक रहमान, 17 फरवरी, 2026 को शपथ लेंगे। भारत सहित तेरह देशों को समारोह में आमंत्रित किया गया है। भारत के पीएम मोदी पूर्व प्रतिबद्धताओं के कारण भाग लेने में असमर्थ हैं; लोकसभा अध्यक्ष ओम बिरला भारत का प्रतिनिधित्व कर सकते हैं।