भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 05:58 IST2025-05-01T05:57:43+5:302025-05-01T05:58:19+5:30
ट्रम्प प्रशासनाने भारतासोबतच्या व्यापारी समझौत्यावर काम केले आहे. मात्र, त्याची घोषणा करण्यासाठी भारताचे पंतप्रधान आणि संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
वॉशिंग्टन: भारताशी टॅरिफविषयक वाटाघाटी सुरू असून, लवकरच समझौता होईल, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले.ट्रम्प प्रशासनाने भारतासोबतच्या व्यापारी समझौत्यावर काम केले आहे. मात्र, त्याची घोषणा करण्यासाठी भारताचे पंतप्रधान आणि संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर २६ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावले आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकी सरकारच्या नव्या धोरणात विद्यार्थी टार्गेटवर
वॉशिंग्टन : अमेरिकी सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत नव्याने माहिती देणे सुरू केले आहे. यात कशा प्रकारे हजारोंना निशाणा बनवण्यात आले आहे व त्यांची कायदेशीर मान्यता समाप्त करण्यासाठी कोणते निकष लावले आहेत, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय अचानक प्रवेश रद्द करण्यात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी खटले दाखल केले होते. मागील महिन्यात अमेरिकेतील विदेशी विद्यार्थी त्रस्त झालेले होते.