शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

इस्रायलच्या निशाण्यावर आल्यास मृत्यू 'पक्का'! कुणाला रिमोटच्या बंदुकीनं मारलं, तर कुणाला टूथपेस्टनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 11:46 IST

Target killing By Israel: इस्रायलने इराणसह अनेक देशांमध्ये आपल्या सत्रूंच्या हत्या घडवून आणल्याचा आरोप होत आहे.

तेहरानमध्ये हमासचा राजकीय नेता इस्माइल हनियेहच्या हत्येनंतर, इस्रायल आणि इराण यांच्यात थेट लढाई सुरू होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. खरे तर, इस्रायलने या हत्येजी जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, हमास आणि इराणने हनियेहच्या हत्येसाठी इस्रायललाच जबाबदार ठरवले आहे. एढेच नाही तर हनियेहच्या मृत्यूचा बदला घेणे तेहरानचे कर्तव्य असल्याचे इराणचे सर्वेसरावा खामेनेई यांनी म्हटले आहे.

इस्रायलने इराणसह अनेक देशांमध्ये आपल्या सत्रूंच्या हत्या घडवून आणल्याचा आरोप होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, इस्रायली पत्रकार रोनेन बर्गमॅनने आपल्या 2018 च्या "राइज अँड किल फर्स्ट" या पुस्तकात, विषारी टूथपेस्ट, रिमोट-कंट्रोल बॉम्ब, फुटणारे फोन आदींशी संबंधित 2,700 हून अधिक ऑपरेशन्सची माहिती दिली आहे.

इस्रायलने दीर्घ काळ पॅलेस्टाइनचे नेते राहिलेले यासर अराफात यांना विष दिले होते, असा बर्गमॅन यांचा दावा आहे. मात्र इस्रायल  याचे खंडन करतो. याशिवाय, तेहराननेही इस्रायलवर इराणमध्ये अनेकांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

इराणचे अणुशास्त्रज्ञ -इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमातील एक मुख्य व्यक्ती मानले जाणारे वैज्ञानिक मोहसेन फखरीजादेह यांची नोव्हेंबर 2020 मध्ये हत्या करण्यात आली. यासाठी रिमोट-नियंत्रित मशीन गनचा वापर करण्यात आला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, फखरीजादेह अेक वर्षांपासून इस्रायली गुप्तचर संस्थांच्या टॉप टारगेट्सपैकी एक होते. याशिवाय, 2010 मध्ये तेहरानच्या वेगवेगळ्या भागात  अणवस्त्र कार्यक्रमाशी संबंधित दोन जणांना कार बॉम्बने उडवण्यात आले होते. यातील एकाचा मृत्यू झाला तर एक दुसरा गंभीर जखमी झाला होता.

रहस्यमय विष -2022 मध्ये, इराणचे दोन वैज्ञानिक अचानक आजारी पडले आणि कीही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. इस्रायलने त्यांना जेवणातून विष दिल्याचे, इराणचे म्हणने होते. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणSoldierसैनिकDeathमृत्यू