शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

महासंकट! तालिबानी दहशतनाद्यांनी अमेरिकेची शस्त्रास्त्रे लुटली, भारताआधी 'या' दैशात घालू शकतात थैमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 18:48 IST

संबंधित अधिकार्‍यांनी म्हटले आहे, की मुळची अमेरिकन शस्त्रे विशेषतः छोटी शस्त्रे तालिबानकडून पाकिस्तानला पाठविली जात आहेत. अशा प्रकारचे बरेच इनपुट्स आम्हाला मिळत आहेत. (Taliban terrorist looted American weapons)

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. यातच, भारतीय उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी मंगळवारी एक धक्कादायक माहिती दिली. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाण सैन्याकडून अमेरिकन शस्त्रे लुटली आहेत आणि ती  पाकिस्तानात पाठविली आहेत, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या शस्त्रांचा वापर करून दहशतवादी भारताआधी पाकिस्तानातच थैमान घालू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, भारतातील सक्रीय असलेल्या दहशतवादी गटांनाही ही शस्त्रे पुरविण्याची शक्यता आहे, मात्र, आपले सुरक्षा दर त्यांचा सामना करण्यासाठी तयार आहेत, असेही अधिकार्‍यांनी म्हटले आहे. (Taliban terrorist looted American weapons likely to be first used for violence in pakistan before reaching india)

सीआयएच्या संचालकाची तालिबानी नेत्यासोबत काबूलमध्ये गुप्त बैठक

संबंधित अधिकार्‍यांनी म्हटले आहे, की मुळची अमेरिकन शस्त्रे विशेषतः छोटी शस्त्रे तालिबानकडून पाकिस्तानला पाठविली जात आहेत. अशा प्रकारचे बरेच इनपुट्स आम्हाला मिळत आहेत. मात्र, तालिबानच्या विजयाने दहशतवादी गटांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे तेथे या शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता अधिक आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने गेल्या 20 वर्षांत अफगाण सैन्याला M-16 आणि M-4 असॉल्ट रायफल्ससह 6.5 लाखहून अधिक लहान शस्त्रे पुरवली आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणावर दारूगोळाही दिला आहे. 

अमेरिकन सैन्याने अफगाण सैनिकांना मोठ्या प्रमाणावर बुलेटप्रूफ उपकरणे, नाईट व्हिजन गॉगल्स आदी गोष्टीही दिल्या होत्या. मात्र, तालिबान्यांनी तिही लुटली आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात स्नायपर रायफल्सदेखील दहशतवादी गटाच्या हाती गेल्या आहेत. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानIndiaभारत