शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेला सुरुवात, तालिबाननं जबीहुल्लाह मुजाहिदला केलं सांस्कृतिक व सूचना मंत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 15:39 IST

Islamic Emirate of Afghanistan: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद (Zabihullah Mujahid) याला देशाच्या सांस्कृतिक आणि सूचना मंत्रिपदी नियुक्त केलं

Islamic Emirate of Afghanistan: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद (Zabihullah Mujahid) याला देशाच्या सांस्कृतिक आणि सूचना मंत्रिपदी नियुक्त केलं आहे. याच मुजाहिदनं काल तालिबान्यांकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करुन जगासमोर तालिबानची भूमिका स्पष्ट केली होती. (Taliban spokesman zabiullah mujahid appointed as minister of culture and information afghanistan)

जबीहुल्लाह मुजाहिद यानं काल माध्यमांसमोर तालिबान्यांची भूमिका स्पष्ट करताना अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार नेमकं कसं असेल याची माहिती दिली होती. यात इस्लामी नियमांचं पालन करुन महिलांच्या अधिकारांचा सन्मान केला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. तसंच आपला विरोध करणाऱ्या सर्वांना माफ केलं असून आमचं आता कुणाहीसोबत शत्रुत्व नाही असंही म्हटलं होतं. 

तालिबान आता बदलला आहे हेच त्यांनी पत्रकार परिषदेतून जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचीही जबीहुल्लाह यांनी उत्तरं दिली होती. जबीहुल्लाह मुजाहिद गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच कॅमेरासमोर आला होता. 

जबीहुल्लाह मुजाहिद यानं पत्रकारांना अतिशय शांतपणे दिलेली उत्तरं पाहून अनेकांना धक्का बसला होता. रक्तपात आणि हिंसक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तालिबानचं अचानक शांतीप्रिय स्वरूप पाहून अनेकांना धक्का बसला. ज्या खुर्चीवर अफगाणिस्तान सरकारमधील माहिती व प्रसारण मंत्री पत्रकार परिषद घेत असत त्याच खुर्चीवर बसून मुजाहिद यांनं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली होती. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान