शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: 'भारत भूमिका बदलेल आणि आमची साथ देईल अशी आशा', तालिबान प्रवक्त्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 17:51 IST

Taliban On India: अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं भारताबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आपली भूमिका बदलेल आणि आम्हाला साथ देईल अशी आशा तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं व्यक्त केली आहे.

Taliban On India: अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं भारताबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आपली भूमिका बदलेल आणि आम्हाला साथ देईल अशी आशा तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानच्या नवनिर्माणासाठीचा तालिबानचा रोडमॅप पूर्णपणे तयार असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल असंही तालिबानकडून सांगण्यात आलं आहे. 

"भारत लवकरच आपल्या भूमिकेत बदल असेल अशी आशा आहे. कारण याआधी भारत इथं थोपविण्यात आलेल्या सरकारची बाजू घेऊन बोलत होता. त्यामुळे आता येणाऱ्या नव्या सरकारचीच ते बाजू घेतील कारण दोन्ही देशांसाठी हेच फायद्याचं ठरेल", असं तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीननं म्हटलं आहे. 

अफगाणिस्तानची राजधानी काबुलस्थित राष्ट्रपती भवनावर रविवारी तालिबान्यांनी कब्जा केला. त्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविल्याचं तालिबान्यांकडून जाहीर करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देखील देश सोडून निघून गेले आहेत. काबुलच्या सध्याच्या परिस्थितीबाबत शाहीन म्हणाला की, "आमच्या सुरक्षा दलानं काबुलमधील सुरक्षा व्यवस्था ठीक राहावी यासाठी शहरात प्रवेश केला होता. जेणेकरुन येथील नागरिकांची संपत्ती सुरक्षित राहील आणि कुणालाही त्रास होणार नाही. याआधी आम्ही काबुलच्या सीमेवरच तैनात राहावं असं सैनिकांना सांगितलं होतं. पण काबुलमध्ये लुटमार आणि नागरिकांच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे शहरात प्रवेश करावा लागला. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आमच्या सुरक्षा दलानं परिस्थिती नियंत्रणात आणली  आणि सर्व सुत्र हातात घेतली आहेत"

दुतावास आणि राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षाभारतासह अनेक देशांनी आपली राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना अफगाणिस्तानमधून सुखरूपरित्या परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, देशातील सर्व परदेशी दूतावासांना तालिबानकडून सुरक्षा दिली जाईल असं आश्वासन तालिबानी प्रवक्त्यानं दिलं आहे. "आम्ही सर्व परदेशी दूतावास आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना सुरक्षा देऊ, तर इतर देशांमधील आमच्या दूतावासाबाबतचा निर्णय सरकार अस्तित्वात आल्यानंतर घेतला जाईल", असं सुहैल शाहीन म्हणाला.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी