तालिबान्यांनी पेटवले टँंकर

By Admin | Updated: July 6, 2014 01:54 IST2014-07-06T01:54:31+5:302014-07-06T01:54:31+5:30

तालिबानने काबूलजवळ केलेल्या बॉम्बहल्ल्यात इंधनाचे जवळपास 2क्क् टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या टँकरद्वारे अफगाणिस्तानात तैनात परदेशी सैनिकांचे इंधन आणण्यात आले होते,

The Taliban organized the tanker | तालिबान्यांनी पेटवले टँंकर

तालिबान्यांनी पेटवले टँंकर

काबूल : तालिबानने काबूलजवळ केलेल्या बॉम्बहल्ल्यात इंधनाचे जवळपास 2क्क् टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या टँकरद्वारे अफगाणिस्तानात तैनात परदेशी सैनिकांचे इंधन आणण्यात आले होते, असा दावा या दहशतवादी संघटनेने केला आहे.  हे टँकर अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेशाच्या प्रतीक्षेत उभे होते. तेव्हा त्यांना आग लावण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अमेरिकी लष्करासोबत मागील तेरा वर्षापासून तालिबान दहशतवाद्यांचा लढा सुरू आहे. पश्चिमी भागात ते अनेकदा रसद पुरवठय़ाच्या ताफ्यांवर हल्ले करीत असतात. रात्री उशिरा तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. (वृत्तसंस्था)

 

Web Title: The Taliban organized the tanker