शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानात आज सरकार स्थापन करणार तालिबान?, महिलांना संधी नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 08:36 IST

Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य पूर्णपणे माघारी परतल्यानंतर तालिबान्यांच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य पूर्णपणे माघारी परतल्यानंतर तालिबान्यांच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. तालिबानकडून आज अफगाणिस्तानात नव्या सरकारची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या नमाजनंतर तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती एएफपी संस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. अमेरिकेनं सैन्य पूर्णपणे मागे घेतल्यानंतर त्याच दिवशी तालिबाननं काबुल विमानतळही ताब्यात घेतलं. तर पंजशीरमध्येही तालिबानी घुसखोरी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. (Taliban may announce new government in Afghanistan today after Namaz)

तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबातुल्ला अखुंदजादा तालिबान सरकारचा सुप्रीम नेता म्हणून घोषीत केलं जाण्याची शक्यता आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं अफगाणिस्तानातील दूतावास सुरू ठेवणं आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचं आश्वासन दिल्याचं तालिबानी प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे कतारनंही काबुल विमानतळ पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी तालिबानसोबत चर्चेला सुरुवात केली आहे. 

महिलांना सरकारमध्ये स्थान नाहीचयुद्धग्रस्त अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तालिबान भक्कम सरकार देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे तालिबानकडून सर्वसमावेशक सरकार दिलं जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत असली तरी तालिबान सरकारमध्ये महिलांना संधी दिली जाण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जात आहे. अफगाणिस्तानातील हेरात येथे कामाच्या अधिकारांसाठी आणि नव्या सरकारमध्ये महिलांना संधी देण्यासाठी काही महिलांना रस्त्यावर उतरुन निदर्शनं केल्याचंही समोर आलं आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान