शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Taliban in kabul Video : भयंकर... हा हॉलिवूडच्या चित्रपटातील सीन नसून काबुल विमानतळाची सद्यस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:48 IST

अफगाणिस्तानातील हजारो सामान्य नागरिकही काबूल सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत.

काबुल - अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. रविवारी अफगाणिस्तानात मोठ्या घडामोडी घडल्या. तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेश करुन राष्ट्रपती भवन आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह अनेक मोठे नेते देश सोडून गेले आहेत. त्यामुळे, अनेक नागरिकही विमानतळावर गर्दी करत आहेत. येथील काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.  

अफगाणिस्तानातील हजारो सामान्य नागरिकही काबूल सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे. तर, विमानतळावर मुंबईतील लोकल रेल्वे पकडण्यासाठी होत असलेल्या गर्दीचे रुपडे दिसत आहे.  काबुल विमानतळावर झालेल्या गोळीबारात आत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानतळावरही विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. पत्रकार Natalie Amiri यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विमानतळावर जमीनीपासून काही उंचीवरच हेलिकॉप्टर उडताना दिसत आहेत. येथील रनवे रिकामा करण्याचा प्रयत्न तालिबानकडून होत आहे. एक भयंकर व्हिडिओ समोर आला असून अमेरिकन सैन्य दलाच्या विमानच्या खालील भागाला पकडून काबुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. मात्र, विमानाने गती घेताच, हे नागरिक खाली कोसळले आहेत. एका प्राध्यापकाने मुस्लीम शिरजाद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानKabul Bomb Blastकाबूल बॉम्बस्फोटAirportविमानतळ