शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत लोकांचे फोटो काढू नका; तालिबानचे अजब फर्मान, कारणही एकदम भन्नाट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 15:25 IST

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने एक नवीन फर्मान काढले आहे.

अफगाणिस्तानमधीलतालिबान सरकारने एक नवीन फर्मान काढले आहे. तालिबानने अनेकदा महिला आणि अल्पसंख्याकांवर निर्बंध लादणारे आदेश दिले आहेत. आता त्यांनी एक अनोखा आदेश जारी केला आहे. तालिबानने नव्या आदेशानुसार, जिवंत लोक आणि प्राण्यांचे फोटो काढण्यास बंदी घातली आहे. लष्करातील अधिकाऱ्यांसह सर्वांना आदेश जारी करताना, कंदाहारमधील तालिबान सरकारने म्हटले की, जिवंत लोक आणि प्राण्यांचे फोटो काढणे चुकीचे आहे. जर कोणी हे कृत्य करताना आढळल्यास त्याला आळा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरं तर तालिबानची सुरूवातच कंदाहार या शहरातूनच झाली होती. २०२१ मध्ये अमेरिकेच्या प्रस्थानानंतर या कट्टरतावादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये स्वतःचे सरकार स्थापन केले. 

तालिबानने एक पत्रक जारी करून हे फर्मान काढले. तालिबानने जारी केलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे की, जिवंत लोकांचे फोटो काढल्यास त्यांचे इतर वस्तूंच्या तुलनेत अधिक नुकसान होते. अशा परिस्थितीत कोणत्याही औपचारिक किंवा अनौपचारिक परिषद, बैठक किंवा कार्यक्रमात लोकांचे फोटो काढू नयेत. फोटो काढल्यामुळे निर्जीव वस्तूंपेक्षा जास्त नुकसान होते. हा नियम सरकारी कार्यक्रमांनाही लागू होणार असून कोणत्याही सभेत फोटो काढले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

तालिबानचे अजब फर्मान जारीदरम्यान, अनोखा आदेश जारी करताना तालिबानने इस्लामिक कलेत मानव आणि प्राण्यांचे फोटो काढण्यास मनाई असल्याचा तर्क दिला आहे. याबाबत कंदाहारच्या राज्यपालांच्या प्रवक्त्याला विचारले असता, तसा आदेश जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे फक्त सरकारी अधिकाऱ्यांनाच लागू होईल. प्रवक्ते महमूद आझम म्हणाले, "हा निर्णय सामान्य लोक आणि स्वतंत्र माध्यमांसाठी नाही". खरं तर याआधीही १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. तेव्हा देखील कट्टरपंथी इस्लामिक संघटनेने जिवंत लोकांचे फोटो काढणे आणि व्हिडीओ बनवणे यावर बंदी घातली होती.

तालिबानने मीडिया संस्थानांना देखील रोखले आहे. अडीच वर्षांपूर्वी सत्तेत परतल्यानंतर तालिबानने अनेक मीडिया संस्थांना जिवंत लोकांचे फोटो प्रसारित करण्यापासून रोखले आहे. मात्र, तालिबानचे उच्च अधिकारी स्वत: इतर देशांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीचे फोटो शेअर करत असतात. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान