शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानच्या हाती लागले 8.84 लाख अमेरिकन हत्यारं, आधुनिक विमान आणि हेलिकॉप्टरवरही कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 14:59 IST

Afghanistan Crisis: 2003 पासून ही लष्करी उपकरणं अफगाण सैन्य आणि पोलिसांसाठी खरेदी केली जात होती.

ठळक मुद्दे इतकी मोठी शस्त्रे एका मजबूत सैन्याची उभारणी करण्यासाठी पुरेसे आहेत.

काबुल: अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानमध्येतालिबाननं सत्ता काबीज केली. तालिबानची सत्ता येताच राष्ट्रपतींसह देशातील मोठे नेते देश सोडून पळून गेले. आता देशातील सर्व ठिकाणी तालिबानी सैनिक दिसत आहेत. तालिबानची सत्ता आल्यानंतर जनजीवनही विस्कळात झालंय. आधुनिक हत्यारांनी युक्त असलेल्या तालिबानला आता देशातून पळवून लावणं अवघड झाल्याचं दिसत आहे. पण, अफगाणिस्तानमध्ये अशी परिस्थिती येण्याची ही पहिलीच वेळ नाही.

19 व्या शतकाच्या सुरुवातीपासून अफगाणिस्तान हे इतर मोठ्या देशांसाठी खेळाचं मैदान म्हणून काम करत आलंय. 19 व्या शतकात ब्रिटन, 20 व्या शतकात रशिया आणि 21 व्या शतकात अमेरिका. प्रत्येक वेळी सुरुवातीच्या विजयानंतर, तिन्ही महासत्तांना शेवटी पराभूत व्हावं लागलंय. 1989 मध्ये रशियन सैन्यानं माघार घेतल्यानंतर आधी मुजाहिदीन आणि नंतर तालिबान रशियन AK 47 सह टी -55 टँकवर स्वार होताना दिसले होते. पण, आता हेच तालिबानी अमेरिकेच्या लष्करी वाहनांवर स्वार होऊन हातात M16 रायफल घेतेलले दिसत आहेत.

तालिबानच्या हाती हत्यारांच भांडारफोर्ब्सच्या अंदाजानुसार, अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये 8,84,311 आधुनिक लष्करी उपकरणं सोडली आहेत. यामध्ये M16 रायफल, M4 कार्बाईन्स, 82 मिमी मोर्टार लाँचर्स यासह हम्वी, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर, A29 लढाऊ विमान, नाईट व्हिजन, दळणवळण आणि पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणांचा समावेश आहे. 2003 पासून ही लष्करी उपकरणं अफगाण सैन्य आणि पोलिसांसाठी खरेदी केली जात होती. फोर्ब्सनं अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉनच्या डिपार्टमेंट ऑफ लॉजिस्टिक एजन्सी (DLA) च्या डेटाबेसचा अभ्यास करुन हा डेटा गोळा केला आहे.

अफगाणिस्तावर अमेरिकेचा 6 लाख कोटींचा खर्चतालिबानच्या विरोधात युद्ध पुकारणाऱ्या अमेरिकेनं 2003 पासून अफगाण सैन्य आणि पोलिसांच्या शस्त्रं आणि प्रशिक्षणावर 83 अब्ज डॉलर म्हणजेच 6 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेल्या लष्करी उपकरणांमध्ये 5.99 लाखांहून अधिक शुद्ध शस्त्रे, 76 हजारांहून अधिक लष्करी वाहनं आणि 208 लष्करी विमानांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानच्या सैन्यानं माघार घेतल्यानंतर यातील बहुतेक शस्त्रं तालिबानच्या हाती लागली आहेत. इतकी मोठी शस्त्रे मजबूत सैन्य उभारण्यासाठी पुरेसे आहेत. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिका