अफगाणमध्ये भारतानं बनवलेल्या सलमा डॅमवर तालिबानी हल्ला, 10 पोलीस शहीद
By Admin | Updated: June 25, 2017 18:44 IST2017-06-25T18:44:37+5:302017-06-25T18:44:37+5:30
अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात शनिवारी रात्री सलमा डॅमवर तालिबान्यांनी हल्ला चढवला आहे

अफगाणमध्ये भारतानं बनवलेल्या सलमा डॅमवर तालिबानी हल्ला, 10 पोलीस शहीद
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 25 - अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात शनिवारी रात्री सलमा डॅमवर तालिबान्यांनी हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले आहेत. अफगाणिस्ताननं सलमा डॅम हा भारताच्या सहकार्यानं बनवला आहे. या डॅमचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी जून महिन्यात केलं होतं.
या हल्ल्यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्ट्नुसार, तालिबान्यांनी केलेल्या या दहशतवादी हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले आहेत. तसेच या हल्ल्यात 4 गंभीर स्वरूपात जखमी आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी हेरात प्रांतातील चश्ता जिल्ह्यात एका तपासणी नाक्यावर हल्ला केल्यानंतर सलमा डॅमला लक्ष्य केलं आहे.