शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान हे ISI च्या इशाऱ्यावर नाचणारी बाहुली, पाकिस्तान लवकरच उद्ध्वस्त होणार; तालिबानचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 17:14 IST

Pakistan-Taliban Relations: तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इम्रान खान हे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या (ISI) इशाऱ्यावर नाचणाऱ्या बाहुलीसारखे आहेत, असं विधान तालिबानी नेत्यानं केलं आहे.

Pakistan-Taliban Relations: तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इम्रान खान हे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या (ISI) इशाऱ्यावर नाचणाऱ्या बाहुलीसारखे आहेत, असं विधान तालिबानी नेत्यानं केलं आहे. "इम्रान खान सरकार इस्लामिक अमिरातच्या विरोधात राष्ट्रवादी अफगाणी नागरिकांना भडकवण्याचं काम करत आहे. हे त्यांच्या उद्दीष्टांपैकी एक आहे. लवकरच पाकिस्तान उद्ध्वस्त होईल आणि ते FATF च्या काळ्यात यादीत सामाविष्ट होतील, असं तालिबानचा एक प्रवक्ता म्हणाला. 

पाकिस्तान आणि तालिबानमध्ये सध्या विस्तव जात नसल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात दोन्ही देशांमध्ये मैत्रिपूर्ण वातावरण असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता तसं वातावरण राहिलेलं नाही. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) मोईद युसूफ यांनी नुकतंच अफगाणिस्तानसोबतचा ताणलेले संबंध लक्षात घेता प्रस्तावित अफगाणिस्तानचा दौरा देखील रद्द केला आहे.

NRF चा अजूनही संघर्ष सुरूचतालिबानला अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेऊन आता पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण नॅशनल रेजिस्टेंन्स फोर्स (NRF) अजूनही तालिबान्यांचा प्रतिकार करत आहे. NRF चा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात  NRF तालिबान्यांना हाणून पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. तसंच अफगाणिस्तानच्या नागरिकांनी शांत बसू नये. अन्यायाविरोधात आवाज उठवावा असं आवाहन व्हिडिओतून केलं आहे. तसंच आमचा संघर्ष कोणत्याही एका विशिष्ट समहू किंवा जाती विरोधात नसून संपूर्ण अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याची आमची लढाई सुरू आहे, असं NRF चे नेते अहमद मसूद यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान