तालिबानचा हल्ला; काबूलमध्ये २८ ठार

By Admin | Updated: April 20, 2016 03:04 IST2016-04-20T03:04:31+5:302016-04-20T03:04:31+5:30

तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ट्रकबॉम्बचा स्फोट घडवीत केलेल्या हल्ल्यात मंगळवारी २८ ठार, तर शेकडो नागरिक जखमी झाले.

Taliban attack; 28 killed in Kabul | तालिबानचा हल्ला; काबूलमध्ये २८ ठार

तालिबानचा हल्ला; काबूलमध्ये २८ ठार

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ट्रकबॉम्बचा स्फोट घडवीत केलेल्या हल्ल्यात मंगळवारी २८ ठार, तर शेकडो नागरिक जखमी झाले.
तालिबानने दाट लोकवस्तीचा भाग निवडून हल्ला केला. ट्रकबॉम्बचा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, दूर-दूरपर्यंत त्याचे हादरे बसले. खिडक्यांची तावदाने फुटली. घटनास्थळाहून धुराचे लोळच्या लोळ उठून आकाशात त्याचे ढग तयार झाले होते. आत्मघाती हल्लेखोराने संरक्षण मंत्रालयाजवळ ट्रकबॉम्बचा स्फोट घडवून आणला. दुसऱ्या हल्लेखोराने सुरक्षा दलांवर गोळीबार केला; मात्र त्याला लगेच ठार करण्यात आले. हल्ल्यात दोनशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Taliban attack; 28 killed in Kabul