शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan: तुर्कस्तानची लॉटरी लागली; काबुल विमानतळासाठी तालिबानने मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 07:43 IST

Kabul airport in Turkey's Hand: काबुल विमानतळ सुरु ठेवणे तालिबानची गरज आहे. कारण असे न केल्यास जगाशी संपर्क तुटेल. तसेच दहशतवादी मदत, मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तू आदी पुरविण्यासाठी विमानतळ सुरु ठेवावाच लागणार आहे.

अंकारा: काबुल विमानतळावरून (Kabul airport) येत्या 31 ऑगस्टला अमेरिकेचे सैनिक माघारी जाणार आहेत. यामुळे विमानतळ चालविण्यासाठी तालिबानने (Taliban) तुर्कस्तानला (Turkey) निमंत्रण पाठविले आहे. हा विमानतळ सांभाळण्यासाठी तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांनी मोठी फिल्डिंग लावली होती. मात्र, तालिबानने त्यांची मागणी दरवेळी फेटाळली होती. (Taliban asked Turkey for support to run Kabul airport, Turkish officials say.)

आता तालिबानने तुर्कस्तानला काबुल विमानतळासाठी मदत करण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या सैन्यासोबत काबुल विमानतळावर सध्या तुर्कीचे 200 सैनिक तैनात आहेत. तुर्कीकडून तांत्रिक मदत तालिबानने मागितली असली तरी देखील या सैनिकांना 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडावा लागणार आहे. 

रॉय़टर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. तालिबानने सैनिकांनी परत जाण्याची जी अट ठेवली आहे, त्यावरून निर्णय घेणे अंकारासाठी कठीण असेल. मुस्लिम राष्ट्र तुर्की अफगाणिस्तानातील मोहिमेंमध्ये नाटोचा हिस्सा होते. यामुळे आताही काबुल विमानतळावर तुर्कीचे शेकडो सैनिक तैनात आहेत. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही काळासाठी आपल्या सैनिकांना माघारी घेण्यासाठी आपण तयार आहोत. 

काबुल विमानतळ का हवाय...एर्दोगन सरकारने तालिबान राज येण्यापूर्वी काही महिन्यांपासून काबुल विमानतळ चालविण्यास तयार असल्याचे मेसेज पोहोचविले होते. तेव्हा तालिबान नेत्यांनी ते फेटाळले आणि इशाराही दिला होता. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविला तेव्हा तुर्कीने विमानतळावर तंत्रज्ञान आणि सुरक्षा मदत देण्याची ऑफर दिली होती. तेव्हाही तालिबानने ही ऑफर धुडकावली होती. यानंतर तुर्कीने त्यांचा मित्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. 

काबुल विमानतळ सुरु ठेवणे तालिबानची गरज आहे. कारण असे न केल्यास जगाशी संपर्क तुटेल. तसेच दहशतवादी मदत, मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तू आदी पुरविण्यासाठी विमानतळ सुरु ठेवावाच लागणार आहे. तालिबानी नेते देखील विमानतळ बंद झाला तर त्यांच्या मित्र देशांना भेटी देऊ शकणार नाहीत. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAirportविमानतळ